निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 10:22 PM2019-12-30T22:22:37+5:302019-12-30T22:23:10+5:30

निवडणूक निरीक्षक विनय गौडा यांची माहिती : करवंद येथील स्ट्रॉग रूमची केली पाहणी

Vivipat is not used in elections | निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही

Dhule

Next

शिरपूर : ७ जानेवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार नाही़ मतदान जास्तीत जास्त व शांततेत होण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक तथा नंदुरबारचे सीईओ विनय गौडा यांनी येथील निवडणूक विभागाची पहाणी करतांना सांगितले़
३० रोजी सकाळी निवडणूक निरीक्षक तथा नंदुरबारचे सीईओ विनय गौडा यांनी येथील निवडणूक विभागाला भेट देवून माहिती जाणून घेतली़ यावेळी धुळ्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अमोल बागुल, पी़झेड़ रणदिवे, सुवर्णा पवार आदी उपस्थित होते़
सुरूवातीला निवडणूक निरीक्षक सीईओ विनय गौडा यांनी मतदान केंद्राची माहिती जाणून घेतल्यानंतर तहसिल कार्यालयात असलेल्या विविध विभागांना भेटी दिल्यात़ त्यानंतर त्यांनी करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल टॉऊन हॉलमध्ये असलेल्या स्ट्राँगरूमची पहाणी करून कसे मतमोजणी केली जाईल त्याची माहिती तहसिलदार आबा महाजन यांच्याकडून घेतली़ या परिसराला पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे़ यानंतर विनय गौडा यांनी सावळदे येथील जि़प़शाळेत असलेल्या मतदान केंद्राची पाहणी केली़

Web Title: Vivipat is not used in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे