मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:39 AM2021-09-26T04:39:33+5:302021-09-26T04:39:33+5:30

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला ...

'Voter Helpline App' to help voters | मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’

मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाइन ॲप’

Next

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी भारत निवडणूक आयोगाने वेळापत्रक निश्चित केले आहे. १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२२ रोजी ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत; परंतु अद्याप मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा.

मतदार यादीतील नाव कमी करणे, हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक सात भरावा. ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, वय, जन्म दिनांक व पत्ता, नातेवाइकाचे नाव इत्यादी माहितीमध्ये दुरुस्ती किंवा बदल करावयाचा आहे, अशा मतदारांनीदेखील दुरुस्तीचा फॉर्म क्रमांक ८ भरावा. ऑनलाइन स्वरूपात सादर करण्याची सुविधा या ॲपवर उपलब्ध आहे. हे ॲप गुगल पे स्टोअरवरून डाऊनलोड केल्यास त्यावर मतदार यादीतील नावांचा शोध घेणे, वरीलप्रमाणे नाव नोंदणी, दुरुस्ती, नाव कमी करण्याची सुविधा, आपले मतदान केंद्राची विस्तृत माहिती, निवडणूकविषयक चालू घडामोडी, निवडणूक निकाल व इतर विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

तसेच जागरूक मतदार या संकेतस्थळावरही मतदार नोंदणीविषयक वरील अर्ज ऑनलाइनस्वरूपात करू शकता. या संकेतस्थळावर मतदार नोंदणीविषयक, मतदार यादीत नावांचा शोध घेणे, मतदार यादी उपलब्धतेची सुविधा उपलब्ध आहे, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.

Web Title: 'Voter Helpline App' to help voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.