Dhule Municipal Election 2018 : मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:49 PM2018-12-08T21:49:22+5:302018-12-09T12:44:48+5:30

जिल्हाधिकारी राहुल रेखावार : नागरिकांमध्ये अधिकाराबाबत जागृती

Voters must vote frankly | Dhule Municipal Election 2018 : मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

Dhule Municipal Election 2018 : मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे- महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती करण्यासाठी चांगले प्रयत्न झाले. मतदानाच्या अधिकाराबाबत विशेषत: युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती घडून आली आहे. अन्य मतदारही जागरूक असून या निवडणुकीत निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
महापालिका निवडणूकीसाठी रविवारी मतदान होणार आहे़ या प्रक्रियेसाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्ते तसेच मतदारांनी शांतता ठेवावी़ नियम व कायदे पाळावेत, गैरकृत्य करु नये, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी  साधलेला संवाद़़़़
प्रश्न : महापालिका निवडणुकीत निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी काय प्रयत्न झाले. 
राहुल रेखावार : निवडणुकीसाठी महापालिकेचे आयुक्त, प्रशासन यांना आवश्यक सूचना दिल्या. त्याप्रमाणे कार्यवाही झाली, सुरू आहे. शहरात  होर्डिेग्ज लावून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मुख्य निरीक्षक सौरभ विजय, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनीही आवश्यक सूचना दिल्या आहेत. कामगारांना मतदानासाठी वेळ देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे  निश्चितपणे मतदार मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास आहे. 
प्रश्न : मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी काय कार्यवाही केली?
राहुल रेखावार : सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात असून रोजची कार्यवाही व घटना, घडामोडींचा फॉलोअप घेत आहे. जेथे जेवढा हवा तेवढा बंदोबस्त देण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात प्रचार संपला तेव्हापासून तसेच शहर हद्दीपासून २५ कि.मी.च्या आत सर्व प्रकारच्या मद्यविक्रीचे अदेश दिले आहेत. दुकाने उघडी किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. गुंडांवर हदपारी तर काहींना मतदानाच्या दिवशी शहर सोडून जाण्याच्या सूचना दिल्या आहे.
प्रश्न : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीबद्दल आपली काय भूमिका आहे?
राहुल रेखावार : कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चुरशीने लढली जाते. राज्य, राष्टÑीय स्तरावरील विषयांना नव्हे तर स्थानिक विषयांना प्राधान्य असते. कोण उमेदवार आपले प्रश्न सोडवेल, त्या अनुषंगाने लोक मतदान करतात. सक्षम, सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवार निवडण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे. तर मनपाच्या माध्यमातून शहर विकास साधण्यास मदत होईल. 
प्रश्न : मतदान करण्याबाबत मतदारांना काय संदेश द्याल?
राहुल रेखावार : सर्वार्थाने योग्य व धडपड्या उमेदवाराची निवड करा. जो मध्यरात्रीही तुम्हाला मदत करू शकेल. योग्य उमेदवारास मतदान करताना त्याचा पक्ष, जात, धर्म असे कोणते बंधन पाळू नका. मोठ्या संख्येने मतदान करा. सोबत इतरांनाही मतदानासाठी आणा, असे नागरिकांना आवाहन आहे. 
प्रश्न : शहर विकासाबाबत मतदारांना काय सांगाल?
राहुल रेखावार : निवडणूक ही संधी असते. शहराचा विकास झाला तर सर्व सुखी होती. त्यामुळे दूरदृष्टीने आपल्या प्रभागासह संपूर्ण शहराचा विकास करण्याची धडपड व प्रयत्न करतील, निधी खेचून आणतील, अशा उमेदवारांना संधी दिली पाहिजे. 
तरुणांनो, पुढाकार घ्या
या निवडणुकीत नव्या युवा मतदारांनी स्वत:सोबत मतदानासाठी इतरांनाही प्रेरीत करावे, त्यासाठी पुढाकार घ्यावा. मतदान करण्यासाठी पैसे,   दारू, बक्षिसे, भेटवस्तू अशा कोणत्याही आमिषाला बळी          पडू नका. इतरांनाही त्यापासून परावृत्त करा. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही रेखावार यांनी केले.

Web Title: Voters must vote frankly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.