लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:06 PM2018-12-03T23:06:54+5:302018-12-03T23:07:23+5:30

अपंग दिनानिमित्त रॅली : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे प्रतिपादन 

Voting for democratic strengthening requires voting | लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान गरजेचे 

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान गरजेचे 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  लोकशाही सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी करुन दिव्यांग मतदारांनीही मतदान करावे. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शासकीय तांत्रिक  महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. जे. ए. शेख, उपजिल्हाधिकारी  तुकाराम हुलावळे  उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, मनपा़ उपायुक्त रवींद्र जाधव, जि़प़उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, तहसीलदार अमोल मोरे, संजय शिंदे, जि़प़ समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदी उपस्थित होते. कोमल कर्डक यांनी सांकेतिक भाषेत दिव्यांगांना मान्यवरांच्या भाषणांची माहिती  दिली.
दिव्यांग घटकांना सामावून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ असे घोषवाक्य जाहीर केले आहे. तसेच अति विशेष व्यक्तींचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यानुसार दिव्यांग  घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. जेणेकरुन मतदारांना मतदान करणे सुलभ होईल. यावषार्पासून दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणि पुन्हा घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. दिव्यांग मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती व मतदारांपर्यंत त्यांचे हक्क व अधिकार पोचविण्यासाठी आतापर्यंत विविध कायदे, नियम करण्यात आले आहेत. अलिकडेच देशातील सर्व दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक असा कायदा तयार करण्यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले़
यावेळी रघुनाथ केले वाक्श्रवण विद्यालय, श्री संस्कार मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली. जगदिश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय अधिकारी मिसाळ यांनी आभार मानले. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, रत्नाकर वसईकर  उपस्थित होते. 
दिव्यांगांची रॅली
जिल्हाधिकारी कार्यालयापासून दिव्यांगांची रॅली काढण्यात आली. शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम, नायब तहसीलदार प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.  

Web Title: Voting for democratic strengthening requires voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे