धुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:11 AM2020-01-07T11:11:10+5:302020-01-07T11:11:28+5:30
सकाळपासून मतदारांच्या केंद्रावर रांगा
आॅनलाइन लोकमत
धुळे- जिल्हा परिषदेच्या ५१ गट व १०९ गणांसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झालेले आहे. थंडीतही सकाळपासून मतदानासाठी केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत.
धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ गट व ११२ गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिरपूर तालुक्यातील वाघाडी, कोडीद, पळासनेर, रोहिणी व धुळे तालुक्यातील लामकानी हे गट बिनविरोध झाले. तर वाघाडी,वाडी (ता.शिरपूर) व धाडणे (ता.साक्री) हे तीन गण यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे आता ५१ गट व १०९ गणासाठी मतदान होत आहे.गटासाठी १६४ व गणात ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदान सुरू झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून येत आहे.