रासेयोतर्फे मतदान जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:03 PM2019-09-17T23:03:01+5:302019-09-17T23:03:35+5:30
शिरपूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पटेल महाविद्यालयाचा उपक्रम
शिरपूर : येथील आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली़ यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन व फलकाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली.
येथील पटेल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे शुभारंभ प्राचार्य पी़व्ही़ पाटील यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी पर्यवेक्षक प्रदीप पाटील, एऩएस़एस़ प्रमुख बी़एऩ अहिरे, एस़आऱ महाजन, एस़आऱ पाटील, पी़टी़ चौधरी, एस़आऱ देसले, गुलाब मराठे, आऱए़ जोशी, ज्योती माळी, भाग्यश्री पाटील, राजपूत आदी उपस्थित होते़
प्राचार्य पी.व्ही. पाटील यांनी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी समाधानकारक व्हावी, यासाठी प्रत्येक अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले. तसेच जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे आणि वृध्द व्यक्तींना आपल्या वॉर्डपर्यत पोहचविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही सांगितले.
रॅलीस पटेल मेन बिल्डींगपासून सुरूवात झाली. शहरातील नगरपालिका मार्गे कुंभारटेक, अंबिकानगर, मार्केट यार्डरोड या मार्गे पुन्हा पटेल कनिष्ठ महाविद्यालयात रॅली आली. त्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.