सातपुड्यात गिधाडांची खानावळ सुरू
By admin | Published: July 14, 2017 12:02 AM2017-07-14T00:02:54+5:302017-07-14T00:02:54+5:30
दोन वर्षांनंतर सुरूवात : वनविभागाकडून गोºयामाळ येथे पक्ष्यांना अन्नपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली गिधाडांची खानावळ अखेर सातपुड्यात सुरू झाली आहे़ एप्रिल महिन्यापासून या खाणावळीसाठी वनविभागाला अनुदान प्राप्तीचे आदेश मिळाल्याने गिधाडांना अन्न पुरवठा करणे विभागाला शक्य झाले आहे़ औषध म्हणून दिल्या जाणाºया
‘डायक्लोफेनॅक’ या औषधीचा गुरांवर वाढता वापर आणि वनांमध्ये वन्यजीवांचे घटते प्रमाणे यामुळे १५ वर्षांपूर्वी गिधाडांची संख्या सातपुड्यात झपाट्याने कमी झाली़ जंगल आणि ग्रामीण क्षेत्रात सफाईची महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे गिधाडच वनातून नामशेष होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तळोदा येथील वन वनपरिक्षेत्र कार्यालयाने नाशिक जिल्ह्यातील ‘रेस्टॉरंट’ प्रकल्पाच्या धर्तीवर तळोदा तालुक्यातील गोºयामाळ येथे गिधाडांसाठी खाणावळ सुरू करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी वनविभागाकडे दिला होता़ दोन वर्षे लालफितीत अडकलेला हा हा प्रस्ताव वनविभागाने मंजूर करून प्रकल्पाला सुरुवात केली आहे़ पहिल्या टप्प्यात या खाणावळीत दोन मृत गुरे टाकून गिधाडांना अन्न पुरवठा करण्यात येत आहे़
सातपुड्यातील मोजक्याच शिल्लक असलेल्या गिधाडांचे खाणावळ प्रकल्पामुळे पोषण होऊन ते नामशेष होण्यापासूनही वाचणार आहेत़
गोºयामाळ परिसरात ३५ ते ४० गिधाडांचा एक थवा आहे़ या गिधाडांची गणना करण्याचा प्रयत्न वनविभागाने केला होता़ मात्र काही गिधाडे इतरत्र निवास करून पुन्हा याठिकाणी परतत असल्याने त्यांच्या एकूण संख्येबाबत कायम संभ्रम राहिला आहे़ तळोदा वनक्षेत्रातील गोºयामाळ येथेच सध्या गिधाडांचा रहिवास आहे़ याव्यतिरिक्त धडगाव तालुक्यात एके ठिकाणी सहा ते सात गिधाडांचा समूह आहे़ या सर्व गिधाडांना खाणावळ प्रकल्पातून खुले अन्न मिळणार आहे़
गोºयामाळ संयुक्त वनव्यवस्थापन समितीने आतापर्यंत दोन गुरांना याठिकाणी टाकल्याची माहिती आहे़ याठिकाणी तळोदा तालुक्यातील सपाटीच्या गावातून गुरे घेऊन जाणे शक्य नसल्याने गोºयामाळ, सोजरबार आणि इतर ठिकाणावर मेलेली गुरे याठिकाणी आणली जाणार आहेत़ यासाठी या समितीला निधी मिळणार असल्याने त्यांच्याकडून मेलेल्या गुरांचा किंवा जंगलात नैसर्गिकरीत्या मेलेल्या प्राण्यांचा शोध सुरू घेण्यात येतो़ दर दिवशी समितीच्या लोकांकडून आसपासच्या पाड्यांवर सूचना करण्यात येते़ मयत गुराची तपासणी करून मगच ते तयार केलेल्या तारेच्या कुंपणात टाकण्याच्या सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या आहेत़