धुळयातील वलवाडी ग्रामपंचायतीची चौकशी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 05:08 PM2018-05-31T17:08:06+5:302018-05-31T17:08:06+5:30
आयुक्तांना अहवाल सादर, फौजदारी कारवाईची शिफारस
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहर हद्दवाढ जाहीर झाल्यानंतर मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या वलवाडी ग्रामपंचायतीने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात केलेल्या कर वसुलीच्या चौकशीचे आदेश आयुक्तांनी दिले होते़ त्यानुसार हस्तलिखीत चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला आहे़ हद्दवाढीनंतरच्या काही दिवसांत करवसुलीत आर्थिक अनियमितता आढळून आल्याने जबाबदार कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे़
शहर हद्दवाढीनंतरच्या काही दिवसांत वलवाडी ग्रामपंचायतीत मनपाने नेमलेल्या कर्मचाºयांनी पूर्वपरवानगीशिवाय कर भरणा स्विकारला़ मालमत्ताधारकांनी कर भरण्यासाठी दाखविलेल्या तत्कालिन ग्रामपंचायतीच्या कर पावत्या परस्पर ग्राह्य धरून कर भरणा स्विकारण्यात आला़ परंतु त्या पावत्या खºया कि खोट्या याची खातरजमा करण्यात आली नाही किंवा वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी घेण्यात आली नाही़ त्यामुळे करवसुलीच्या रक्कमांची स्पष्टता होत नसून प्रथमदर्शनी मोठी आर्थिक अनियमितता दिसून येत आहे़ त्यामुळे जबाबदार कर्मचाºयांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे चौकशी अहवालात नमुद आहे़ अहवाल तपासून योग्य तो निर्णय घेऊ, अशी माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली़ त्यामुळे कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे़