व्हीव्हीआयपी बंदोबस्ताचा ‘धुळे पॅटर्न’ राज्यभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:21 PM2019-05-04T22:21:30+5:302019-05-04T22:21:55+5:30

गोपनीय नियोजनावर सर्वाधिक लक्ष

VVIP Bandout 'Dhule Pattern' across the state | व्हीव्हीआयपी बंदोबस्ताचा ‘धुळे पॅटर्न’ राज्यभरात

व्हीव्हीआयपी बंदोबस्ताचा ‘धुळे पॅटर्न’ राज्यभरात

googlenewsNext

देवेंद्र पाठक। 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळ्यात अथवा जिल्ह्यात कुठेही व्हीव्हीआयपी आल्यानंतर त्यांच्या नियोजनाची, बंदोबस्ताची तयारी करावी लागते़ त्यात गोपनीयतेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले जाते़ धुळ्यात दोन व्हीव्हीआयपी येऊन गेले़ त्यांच्या दौºयाचे नियोजन पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमतेने केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़ त्याची दखल घेण्यात आल्याने त्या नियोजनाचा ‘धुळे पॅर्टन’ राबविण्यास सुरुवात झाली़ त्यानिमित्त जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्याशी ‘लोकमत’ने झालेला संवाद असा-
प्रश्न : व्हीव्हीआयपी नेत्यांचे बंदोबस्त नेमके कसे केले?
पवार : धुळ्यात कोण व्हीव्हीआयपी येणार आहेत, त्यानुसार नियोजन केले जात असते़ कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाही याची खबरदारी देखील तितक्याच गांभिर्याने घेतली जाते़ स्थानिक पातळीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाºयांशिवाय बाहेरुन देखील बंदोबस्त मागविण्यात आला होता़ अधिकारी आणि कर्मचाºयांची संख्या पाहून त्यांना इच्छितस्थळी रवाना करण्यात आले होते़ मार्गदर्शक सूचना केल्यामुळे त्यांनी त्याची अंमलबजावणी केली़ परिणामी शांततेत कार्यक्रम पार पडला़ 
प्रश्न : कोणावर कोणती जबाबदारी सोपविली होती?
पवार : बंदोबस्ताचे नियोजन केल्यानंतर आपल्याकडे स्थानिक आणि बाहेरुन किती अधिकारी, कर्मचारी आहेत याचा सुरुवातीला अभ्यास करण्यात आला़ ज्या ठिकाणी सभा होती त्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी किती अधिकारी, कर्मचारी नियुक्त करायचे याची चाचपणी अगोदरच घेण्यात आली होती़ ते करत असताना कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही़ कोणालाही याबाबत सांगण्यात आलेले नव्हते़ 
प्रश्न : बाहेरील बंदोबस्ताचे नियोजन कसे होते?
पवार : बाहेरील जे अधिकारी, कर्मचारी मागविले होते, त्यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती़ 
गोपनीयतेवर सर्वाधिक लक्ष
व्हीव्हीआयपी नेत्यांच्या दौºयाच्या अनुषंगाने नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ़ छेरींग दोर्जे, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले़ याशिवाय व्यक्ती कोण, त्यानुसार पासेसचे वितरण करण्यात आले़ त्यात देखील कोणालाही प्राधान्य न देण्यात आलेले नव्हते़ याशिवाय सर्वसामान्य नागरीकांना काही त्रास होता कामा नये याची देखील खबरदारी घेण्यात आली होती़ त्यानुसार, वाहतुक सोयीनुसार वळविण्यात आली़ तशी प्रसिध्दी देखील वेळोवेळी देण्यात आली होती़  
मार्गाचेही केले नियोजन
व्हीव्हीआयपी येणार असल्याने त्यांच्या बंदोबस्तानुसार नियोजन असलेतरी ते कोणत्या मार्गाने येतील, त्यात वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली़ त्यात गोपनीयतेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते़ 
बाहेरुन बंदोबस्त मागविल्यानंतर त्यांच्या जेवणासह राहण्याची व्यवस्था करणे हा देखील नियोजनाचा भाग आहे, असेही दत्ता पवार यांनी सांगितले़ 

Web Title: VVIP Bandout 'Dhule Pattern' across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे