पिंजऱ्यांना वृक्षारोपणाची प्रतिक्षाच़़़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 10:50 PM2020-01-23T22:50:26+5:302020-01-23T22:50:44+5:30
महापालिका : शेकडो वृक्ष आणि संरक्षण पिंजरे धुळखात पडून, दुर्लक्षतेमुळे पिंजऱ्यांवर चढतोय गंज
धुळे : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत वृक्ष महापालिकेला मिळाली़ त्यासाठी मशिनचा आधार घेऊन खड्डेही खोदण्यात आले़ यंदा समाधानकारक पाऊस सुध्दा झाला़ सर्वकाही आलबेल असतानाही महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेकडो वृक्ष लागवडीपासून आजही वंचित आहेत़ तर त्याच वृक्षांसाठी आणलेले लोखंडी जाळीचे पिंजरे अक्षरश: याच महापालिकेच्या एका कोपºयात धुळखात पडून आहेत़ कधी त्या वृक्षांची लागवड होईल आणि हे पिंजरे तिथे लावले जातील हा प्रश्नच आहे़ याकडे पदाधिकाºयांसह अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याचे अधोरेखित होत आहे़
शासनाकडून वृक्ष लागवड करण्याची मोहीम पावसाळा सुरु होण्यापुर्वीच राबविण्याचे उद्दिष्ट होते़ त्यानुसार, महापालिकेकडे शेकडो वृक्ष आणि तितकेच पिंजरे देण्यात आले़ त्याचे नियोजन करुन ते धुळेकर नागरिकांना देवून लागवड करण्याचे धोरण आखण्यात आले होते़ मनपाच्या बैठकीत देखील त्यावर काथ्याकूट केल्यानंतर नगरसेवकांच्या माध्यमातून रोपे आणि पिंजरे देण्याचे ठरविण्यात आले होते़ पण, त्याची अद्याप पावेतो अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे़
पावसाळा संपून चार महिने उलटले आहेत़ तरी देखील महापालिकेच्या आवारात रोपे आणि पिंजरे अक्षरश: पडून आहेत़ रोपे आणि पिंजरे का पडून आहेत, यासंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही़ दुसरीकडे मात्र रोपांच्या वाहतुकीवर हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत़ वेळोवेळी हा विषय चर्चेत आला खरा, पण कालांतराने हाच विषय आता दुर्लक्षित झाला आहे़
शासनाकडून महापालिकेला सव्वा लाखांच्या आसपास वृक्ष मिळाली होती़ त्यातील बहुतांश वृक्षांचे लागवड करण्यात आले असलेतरी अजूनही बºयाच प्रमाणात वृक्ष पडून आहेत़ त्यांना लागवडीची प्रतिक्षा लागून आहे़ यावर प्रशासन केव्हा निर्णय घेणार आणि त्याची लागवड करणार याकडे नजरा आहेत़
रोपांच्या वाहतुकीवर अमाप खर्च
महापालिकेने रोपांच्या वाहतुकीवर अमाप खर्च केला आहे़ विशेष म्हणजे त्या ९ लाखांवरील खर्चाला स्थायी समितीने मंजुरी देखील दिली आहे़ पण, त्याचे पुढे काय झाले? यावर बोलायला सध्यातरी कोणीही पुढे येत नाही़ स्थायी समितीच्या वेळोवेळी बैठका देखील पार पडला़ त्यात वृक्ष लागवडीचे काय? यावर चकार शब्द प्रशासनाकडून निघत नाही की सदस्यांकडून बोलला जात नाही, इतकी उदासीनता आहे़
रोपांची केली होती जप्ती, तरीही़़़
महाले प्रतिष्ठानने तयार केलेली रोपे महापालिकेने कारवाई करुन जप्त केल्याची मोहिम जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबविली होती़ यातील बरीच रोपे मोठी होती़ पण, सद्यस्थिती पावसाळा संपून तब्बल ४ महिने झाले आहेत़ मात्र, या रोपांचे भाग्य अद्याप उजळलेले नाही़ कधी या रोपांचे भाग्य उजळणार आणि पडून असलेले पिंजरे कधी वाटप होणार? याची उत्सुकता आता धुळेकर नागरिकांना आहे़