जिल्ह्यात ८० हजार तरूणांना रोजगाराची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:42 PM2019-06-27T18:42:58+5:302019-06-27T18:44:09+5:30

कौशल्य विकास केंद्रात नोंद : रोजगारासाठी तरूणांचे पुणे, मुंबईत दरवर्षी स्थलांतर 

Waiting for employment of 80 thousand youth in the district | जिल्ह्यात ८० हजार तरूणांना रोजगाराची प्रतीक्षा 

dhule

Next

चंद्रकांत सोनार ।  
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  बेरोजगारी दिवसागणिक वाढत आहे. जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दररोज बेरोगारांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. गेल्या दहा वर्षभर जिल्ह्यात ७५ हजार ५५० बेरोजगार तरूणांनी नाव नोंदणी केल्याची माहिती आहे. 
नोकरीच्या अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने रोजगारासाठी बेरोजगारांची पावले आता रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाकडे वळत आहेत. रोजगार कार्यालयात दरमहा सरासरी अडीच हजार बेरोजगार तरुण-तरुणी नोकरीसाठी नोंदणी करीत असून, दर महिन्यात यात वाढच होत आहे. 
दरवर्षी नोंदणीत होते वाढ
जिल्ह्यातील दरवर्षी हजारो युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात फिरताना आढळतात. रोजगार मिळावा या हेतूने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात आपल्या नावाची नोंदणी करून नोकरीची प्रतीक्षा करतात. त्यामुळे हा विभागही सध्या हायटेक झाला आहे; पण सामान्य शेतकºयांच्या मुलापर्यंत रोजगार पोहोचत नसल्याचे चित्र आहे. शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 
बेरोजगारी प्रश्न गंभीर 
जिल्ह्यात बेरोजगार युवकांच्या रोजगार निर्मितीकरिता कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. प्रत्येक वर्षी दहावी, बारावी व पदवी घेणाºया युवकांच्या संख्येसोबतच बेरोजगारीही वाढत असल्याचे दिसून आले आहे. तालुकास्तरावर घेतले जातात मेळावे जिल्ह्यातील बेरोजगारांची वाढती संख्या पाहता येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे रोजगार मेळावे घेऊन देखील बेरोजगारी आकडा अद्याप कमी झालेला नाही़ त्यामुळे बेरोजगारी प्रश्न गंभीर झाला आहे़ बेरोजगारांनी नोंदणी कार्डची वैधता संपल्यानंतर नुतनीकरण केले नाही. जिल्ह्यात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात  बेरोजगारांची नोंदत वाढ झाली आहे़


* असा आहे बेरोजगारीचा आकडा *
दहावीत प्रथम क्षेणीत उर्त्तीण झालेल्या आतापर्यर्त २१ हजार २७० तरूणांची नोंदणी झाली होती. तर दुसºया श्रेणीत दहावीत उत्तीर्ण झालेल्या ३० हजार ६९२ तरूणांनी नोंदणी केली आहे़ पदवीका (डिप्लोमा) शाखेत अभियांत्रिकी १ हजार ५९२, शिक्षणशास्त्र पदवीका २ हजार ५४१ इतर शाखेतील पदवीधर १ हजार ९८४, आयटीआय पदवीका २ हजार ९८७, अंतरवासिका (अपे्रटिंस) प्रथम वर्षातील ६५६, तिसºया वर्षातील ७, पदवीधर कला शाखेतील ७ हजार १८४, विज्ञान शाखा १ हजार ७८४, वाणिज्य शाखा १ हजार ११७, अभियात्रिकी शाखा १ हजार ५४२, वैद्यकिय ३५, कृषी ६३, विधी ३३, शिक्षणशास्त्र पदवी १ हजार ७३२, व्यवस्थापन शाखा १२ इतर ३०८ असे एकूण ७५ हजार ५५० बेरोजगार तरूणांनी नोंदणी केली आहे़

चिंताजनक चित्र : बेरोजगार तरूणांच्या संख्येत दरवर्षी वाढ
1 सात-सात वर्षापुर्वी दहावी तरूण-तरूणी उत्तीर्ण झाले की, उर्तीर्ण झाले की, उत्तीर्ण झाल्याची सनद घेऊन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात केली जात होती़ तसेच १२ वी, पदवी, पदवीत्तर पूर्ण केलेले आपली नोंदणी करून घेत त्यातील अनेकांना सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्थेत रिक्त जागा झाल्या की, पात्रतेनुसार रोजगारही मिळत असे, परंतू  सन २०१२ पासुन विभागाचे नाव बदलुन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्र असे करण्यात आले़ त्यामुळे बेरोजगारांना आॅनलाईन एम्प्लॉयमेंट नोंदणी करता येते़मात्र रोजगार मिळण्याची खात्री नाही़

2 महास्वयंम या संकेतस्थळावर १८ वर्षापुढील तरूणांना रोजगार मिळावा यासाठी घरबसल्या आॅनलाईन नोंदणी करता येवू शकते़ त्यामुळे  रोजगार नोंदणीचा दरवर्षी आकडा वाढत आहे़

3 एकीकडे बेरोजगार नोंदणीच्या संख्येत वाढ होत  आहे़ मात्र आतापर्यत किती जणांना रोजगार मिळाला याबाबत जिल्हा कौशल्य विकास विभागाकडे माहिती नाही़ 

 *  बेरोजगारीचा प्रश्न गंभीर *
   सेवायोजन कार्यालयाची व्याप्ती वाढून रोजगार व स्वयंरोजगार असे करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे कामदेखील रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाला करावे लागते. दरमहा बेरोजगारांना नोकरी मिळावी असे लक्ष्य आहे. मात्र नोकरी देणे किंवा भरती काढणे, उमेदवारांची निवड करणे हे सर्वस्वी संबंधित आस्थापनावर अवलंबून असते. त्यामुळे रोजगाराचे लक्ष्य असले तरी प्रत्यक्षात रोजगार देण्याबाबतचे अधिकार कार्यालयाकडे नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न चितेंत आहे़

* केंद्राकडून रोजगाराचा दावा *
कौशल्य विकास, रोेजगार व उद्योजकाता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून पुणे, मुंबई, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये  रोजगार मिळाल्याची दावा केला आहे. विविध कंपन्यामध्ये जॉब प्लेसमेंट अंतर्गंत तरूणांना संधी देण्यात आली आहे़ तर तरी देखील बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकलेला नाही़ त्यामुळे  पुणे, मुंबई, नाशिक, गुजरात राज्यात तरूणांचे मोठ्या प्रमाणात स्थलातंर होते़ 

*असा आहे बेरोजगारीचा आकडा*


*शाखा नोंदणीची आकडेवारी*

दहावीत प्रथम क्षेणी उर्त्तीण २१ हजार २७०
दहावीत दुसया श्रेणीत उत्तीर्ण  ३० हजार ६९२ 
डिप्लोमा शाखा १ हजार ५९२
शिक्षणशास्त्र २ हजार ५४१ 
इतर शाखा १ हजार ९८४
आयटीआय २ हजार ९८७
अपे्रटिंस  वर्ष तील ६६३
कला शाखा ७ हजार १८४
विज्ञान  शाखा१ हजार ७८४
वाणिज्य शाखा १ हजार ११७
अभियात्रिकी शाखा १ हजार ५४२
वैद्यकिय शाखा ३५
कृषी शाखा ६३
विधी शाखा  ३३
शिक्षणशास्त्र  १ हजार ७३२
व्यवस्थापन शाखा १२ इतर ३०८ 
एकूण ७५ हजार ५५० तरूणांनी नोंदणी केली आहे़
 

 

 

Web Title: Waiting for employment of 80 thousand youth in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे