धुळे जिल्ह्यात ५५ हजार शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 06:08 PM2018-02-12T18:08:34+5:302018-02-12T18:09:37+5:30
कर्जमाफी : लाभ न मिळालेल्या शेतकºयांच्या अर्जांची पडताळणीचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे; तर जिल्ह्यात ५५ हजार ५०३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकºयांच्या अर्ज पडताळणीचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
राज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषीत करण्यात आले होते.
३२ हजार शेतक-यांच्या खात्यात ११८ कोटी जमा
शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आपले सरकार या पोर्टलवर अर्ज केले होते. त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार २०२ शेतकºयांना आतापर्यंत लाभ मिळाला असून या शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११८ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ जमा करण्यात आले आहे.
३२ पैकी २५ हजार शेतकरी जिल्हा बॅँकेचे
कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया एकूण शेतकºयांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार असून त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जानेवारी अखेरपर्यंत जमा झाली आहे. तर उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे कर्जदार असून या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.