कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:57 PM2019-01-01T21:57:56+5:302019-01-01T21:58:58+5:30
महापालिका : वेतन खर्चात दरमहा ७५ लाख रूपयांच्या वाढीचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्य सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे़ त्यामुळे आता महापालिका कर्मचाºयांचे लक्ष देखील नगरविकास विभागाच्या आदेशाकडे लागले आहे़ महापालिकेने सातवा वेतन आयोग लागू केल्यास दरमहा सुमारे ७५ लाख रूपयांचा बोजा मनपावर पडू शकतो़
महापालिकेच्या कर्मचाºयांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देतांना प्रशासनाची चांगलीच आर्थिक ओढाताण झाली होती़ त्यामुळे कर्मचाºयांची कोट्यवधी रूपयांची देणी थकीत होती़ परंतु आयुक्त सुधाकर देशमुख यांनी गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात कर्मचाºयांना थकीत रक्कम अदा केली़ तरीही अजून सुमारे दोन ते अडीच कोटी रूपयांची देणी थकीत आहेत़ दरम्यान, शासनाने राज्य सरकारी कर्मचाºयांना १ जानेवारीपासून पुर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे़ परंतु मनपा कर्मचाºयांना तो लागू होण्यासाठी नगरविकास विभागाचे स्वतंत्र आदेश होणे आवश्यक आहे़ तोपर्यंत मनपा कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागेल़ मनपाला सद्यस्थितीत कर्मचाºयांच्या वेतनावर सुमारे ३ कोटी रूपयांचा खर्च दरमहा करावा लागतो़ पण सातवा वेतन आयोग लागू झाल्यास हा खर्च २५ टक्क्यांनी वाढेल़ त्यामुळे मनपाला वेतनावर दरमहा ३ कोटी ७५ लाख रूपये खर्च करावे लागू शकतात, असा प्राथमिक अंदाज आहे़ मनपा आयुक्तांनी नववर्षाचा संकल्प करतांना कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ वेळीच देण्याचे सुतोवाच केल्यामुळे कर्मचाºयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़