कार दुचाकीच्या अपघातात वाखारकर नगरातील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:24 PM2020-01-04T22:24:50+5:302020-01-04T22:25:12+5:30

गरताड शिवार : कारचालक घटनेनंतर फरार

Wakharkar woman killed in car accident | कार दुचाकीच्या अपघातात वाखारकर नगरातील महिला ठार

कार दुचाकीच्या अपघातात वाखारकर नगरातील महिला ठार

Next

धुळे : चाळीसगाव रोडवरील गरताड शिवारात भरधाव कारने एका मोटारसायकलीला जोरदार धडक दिली़ मोटारसायकलीवरुन पडून कल्पना दिलीप जगताप (३४, रा़ वाखारकर नगर, धुळे) या महिलेच्या डोक्यावरुन कारचे चाक गेले़ त्यात तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू ओढवला़ अपघाताची ही घटना ३ जानेवारी रोजी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली़
गरताड शिवारात अपघात, एक ठार
याप्रकरणी सतिष शांताराम आभाळे (रा़ वेल्हाणे देवाचे ता़ धुळे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, ३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चाळीसगाव रोडने एमएच १८ एव्ही ४३२१ या क्रमांकाच्या मोटारसायकलीने जात असताना धुळे तालुक्यातील गरताड शिवारातील आदित्य पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच ४१ सी ६९९२ क्रमांकाच्या कारने मोटारसायकलीला धडक दिली़ या अपघातात मागे बसलेल्या कल्पना दिलीप जगताप या मोटारसायकलीवरुन खाली पडल्या़ कारचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले़ या अपघातात कल्पना जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ परिणामी त्यांचा मृत्यू ओढवला़
अपघाताच्या ठिकाणी कारचालक न थांबता धुळ्याच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरला़ अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती़ कल्पना जगताप यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले़ याप्रकरणी ३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़
शिराळेजवळ अपघात, एक ठार
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील शिराळे गावाजवळ भरधाव लक्झरी बसने मोटारसायकलला धडक दिली़ यात गोपीचंद उत्तम पाटील (४८, रा़ पाडळसरे ता़ अमळनेर जि़ जळगाव) या इसमाचा मृत्यू झाला़ तर याच अपघातात प्रविण सदाशिव अहिरे (४०, रा़ पाडळसरे ता़ अमळनेर जि़ जळगाव) यांना गंभीर दुखापत झाली आहे़ अपघाताची ही घटना ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी चंद्रशेखर ताराचंद पाटील (रा़ पाडळसरे ता़ अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लक्झरी बसचालक समाधान धनराज देसले या संशयितांविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: Wakharkar woman killed in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.