दत्तमंदिरपासून ते नरडाणापर्यंत हवी पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:15 PM2020-05-09T22:15:59+5:302020-05-09T22:16:25+5:30

प्रशासनाचे हवे लक्ष । प्रभा परदेशी यांची मागणी

Wanted water poi from Datta Mandir to Nardana | दत्तमंदिरपासून ते नरडाणापर्यंत हवी पाणपोई

दत्तमंदिरपासून ते नरडाणापर्यंत हवी पाणपोई

googlenewsNext

धुळे : आपल्या गावाकडे जाणाऱ्यां मजुरांची संख्या पहाता दत्त मंदिर ते नरडाणा गावापर्यं ठिकठिकाणी प्रशासनाने सोय उपलब्ध करीत पाणपोईची उभारावी, अशी मागणी प्रभा परदेशी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे़
सध्या संपुर्ण देशात लॉकडान असल्याने सर्व उद्योग धंदे बंद पडल्याने व वाहतूक व्यवस्था नसल्याने देशभरातील कष्टकरी कामगार आपआपल्या गावी पदयात्रा करत परतत आहेत. तसेच मुंबई-आग्रा या महामार्गावरून दररोज हजारोच्या संखेने नागरिक आपल्या मुळगावी पोहचण्यासाठी उपाशी पोटी व तहानलेल्या अवस्थेत पदयात्रा करत आहेत.परंतू सदरच्या पदयात्रा करणाºया नागरीकांसाठी शासनाकडून कुठलीही मदत केली जात नाही. तसेच सध्या मे महीन्याच्या तप्त वातावरणामुळे अनेक पदयात्री आपल्या गावी पोहचण्या अगोदरच मृत्यू पावत आहेत. म्हणूनच सदरच्या पदयात्री नागरिकांसाठी धुळे देवपुर दत्त मंदिर चौक ते नरडाना गावापर्यंत प्रत्येक तिन किलोमीटर अंतरावर तहानलेल्या पदयात्री नागरिकांसाठी पाणपोई तसेच गुल्कोज बिस्कीट वितरण करण्याची व्यवस्था ही शासकीय खचार्तून करण्यात यावी अशीही मागणी परदेशी यांनी प्रशासनाकडे केली आहे़

Web Title: Wanted water poi from Datta Mandir to Nardana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे