शिरपूर शहरात अद्याप पाणी साचून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:13 PM2017-08-30T13:13:23+5:302017-08-30T13:13:44+5:30

जिल्ह्यात 61 मि.मी. पाऊस : 24 तासात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

Water in the city of Shirpur still! | शिरपूर शहरात अद्याप पाणी साचून!

शिरपूर शहरात अद्याप पाणी साचून!

Next
ठळक मुद्दे नदी-नाले वाहू लागले होत़े विक्रेत्यांची चांगलीत तारंबळ

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 30 -  सलग दुस:या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. परंतु हंगामासाठी पाऊस उपयुक्त ठरणार असल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारच्या अतिवृष्टीमुळे शिरपूर शहरातील विस्कळीत जनजीवन आता पूर्वपदावर येत असले तरी सखल भागात साचलेले पाणी अद्याप कायम आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजेर्पयत संपलेल्या 24 तासांत 61 मि.मी. पाऊस झाला. 
सोमवारी सायंकाळी शिरपूर शहर परिसरात एकाच दिवशी तब्बल 93 मिमी अर्थातच अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तहसील कार्यालयाचा परिसरही पाण्यात गेला. धुळे शहरातही मंगळवारी दमदार पाऊस झाला. दरम्यान, 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
शिरपूरला सर्वाधिक पाऊस 
बुधवारी 8 वाजेर्पयत शिरपूर तालुक्यात सर्वाधिक 24 मि.मी. पाऊस झाला. शिंदखेडा तालुक्यात 21 तर धुळे व साक्री तालुक्यात प्रत्येकी 8 मि.मी. असा एकूण 61 मि.मी. पाऊस नोंदण्यात आला. 
नागरिकांचे हाल 
सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरपूर शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे मंगळवारी नागरिकांना नाहक त्रास सहन करत कार्यालयात यावे लागले. शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आह़े 20 ऑगस्ट रोजी 18 मिमि, 21 ला 77, 22 ला 11, 23 ला 20, 25 ला 26 तर 29 रोजी 93 मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आह़े बुधवारी शहरातील सखल भागात साचलेले पाणी कायम होते. 
91.33 टक्के पाऊस 
शिरपूर तालुक्यात  मंडळानिहाय काल झालेला पाऊस व कंसात आतार्पयत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात 93 (590), थाळनेर 10 (359), होळनांथे 5 (343), अर्थे 22 (395), जवखेडा 20 (383), बोराडी 55 (822), सांगवी 43 (476) म्हणजेच या तालुक्यात आतार्पयत 91़33 टक्के सरासरी इतका पाऊस झाला़ 
सोमवारी झालेल्या पावसामुळे प्रथमच अरूणावती नदी वाहती झाली आह़े मध्यप्रदेश व महाराष्ट्र सरहद्दीवर जोरदार पाऊस झाल्यामुळे प्रथमत: त्या भागातील नदी-नाले वाहू लागले होत़े
शहरातही जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होत़े तहसिल कार्यालयासमोर पावसाचे पाणी साचल़े कार्यालयासमोरील रस्ता वरती व कार्यालय देखील वरती असल्यामुळे आणि त्या दोघांमधील रस्ता खोलगट असल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होत़े
धुळे शहरात मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता दमदार पावसाचे आगमन झाले. अर्धा तास दमदार सरी बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाच वाजता पाऊस पडण्यास सुरुवात झाली. तब्बल एक तास पाऊस सुरू असल्यामुळे आग्रारोड, पाचकंदील, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, साक्री रोड, दत्त मंदिर परिसर व नेहरू चौकातील विक्रेत्यांची चांगलीत तारंबळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी त्यांच्या वस्तू घेत घराकडे धाव घेतली; तर अनेकांनी पावसापासून वस्तूंचे संरक्षण व्हावे, यासाठी वस्तूंवर ताडपत्री टाकली. 

Web Title: Water in the city of Shirpur still!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.