लाखाचे ‘पाणी’ बाराच्या भावात़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:52 PM2019-04-19T22:52:12+5:302019-04-19T22:52:52+5:30
महापालिका : शहरातील जलवाहिनी तसेच गळत्याव्दारे पाण्याची नासाडी थांबविण्यास प्रशासनासमोर आव्हान
धुळे : शहराला पाणीपुरवठा कर णाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिला वारंवार गळत्या व असंख्य व्हॉल्वव्दारे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ दुसरीकडे मात्र उशिरा होणाºया पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांवर भटकंतीची वेळ येवून ठेपली आहे़
६० टक्के भागाला पुरवठा
तापी पाणीपुरवठा योजना २९ जुलै १९९४ पासून कार्यान्वित झाली आहे़ तेव्हापासून शहराच्या ६० टक्के भागाला या योजनेतून पाणीपुरवठा होत आहे़ मात्र दिवसेंदिवस ही जलवाहिनी जीर्ण होत असल्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे़ आजच्या परिस्थितीत शहरातील जलवाहिनी लिकेज, व्हॉल्व गळ्त्या तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणात होणारी चोरीमुळे लाखो लिटर पाणी दर दिवसाला वाया जाते़
शहराची हद्दवाढ तसेच तापी पाणीपुरवठा योजनेतून होणाºया पुरवठ्यातून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे़ मात्र नियोजना अभावी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़
१२० एससीएफटी जलसाठा
तापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम आहे़ नकाणे तलावाची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून सद्य:स्थितीत केवळ १२० एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे़ जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली आहे़ ही जलवाहिनी आता बदलण्याची आवश्यकता आहे़ पण, महापालिकेचे उदासीन धोरण मात्र या कामाला कधी अनुमती देणार? हा प्रश्न आहे़
लाखो लीटर पाणी मातीमोल
जलवाहिनीचे काम झाल्यापासून विचार केल्यास शेकडोवेळा जलवाहिनीला गळती लागली आहे़ त्यातून लाखो लीटर पाणी मातीमोल झाले आहे़ याशिवाय पाणीचोरीचे प्रमाणही दरम्यानच्या काळात वाढले होते़ यावर प्रतिबंध करण्याची नितांत गरज आहे़
पाणी नासाडी थांबणार कधी
एकीकडे उशिरा पाणीपुरवठा तर दुसरीकडे सर्रास व्हॉल्व गळत्याव्दारे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे़
तापमानाचा पारा वाढूू लागल्याने नकाणे, अक्कलपाडा धरणातील जलसाठा कमी होत आहे़ त्यामुळे जुलै महिन्यापर्यत या जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे प्रशासनासमोर आव्हान आहे़
दरवर्षी होतो खर्च
शहरातील पाणीपुरवठा करणाºया तापी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी मनपा प्रशासनाला आर्थिक तरतुद करावी लागते़
त्यामुळे दरवर्षी गळती, दुरूस्तीमुळे नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर उशिरा पाणीपुरवठा केला जातो़