शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणी पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:19 PM2020-04-13T22:19:12+5:302020-04-13T22:19:36+5:30

उन्हाळा : थंड पेयाची दुकाने बंद, यंदा पाण्यावरच भागतेय तहान, उन्हाळ्यात घरगुती उपायांवर भर, रस्ते निर्मनुष्य

Water level reduction in projects in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणी पातळीत घट

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : एप्रिल महिन्यात उन्हाची तिव्रता वाढली असून चटके जाणवू लागले आहेत़ शिरपूर तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पाणीपातळीत घट झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे़
एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलिसांची संचारबंदी तर दुसरीकडे कडक उन्हाळा पडला आहे़ त्यामुळे उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत़ रस्त्यावर माणसांची रहदारी कमी असल्याने तेवढा परिणाम जावणत नाही़ मात्र कोरोनाच्या संकटामुळे थंड पेयावरही संकट उभे ठाकले आहे़
त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेकांना थंड पेयाऐवजी आपली तहान घरातील पाण्यावर भागवावी लागत आहे़ बाजारात कलिंगड विक्रीला येतात पण ग्राहकच नसल्याने कवडीमोल भावाने ही फळे विकावी लागत आहेत़
ऋतुकाळाप्रमाणे एप्रिल महिला सुरू होताच उष्णतेचे चटके बसू लागले आहेत़ खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेमध्ये वाढ झाली आहे़ बाहेर फिरतांना उष्णतेचे चटके अंगाला जाणवतात़ कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक दुकाने वगळता शहरात सर्वच बंद ठेवण्यात आले आहेत़ त्यामुळे शीतपेय तसेच इतर फळे मिळणे आता दुरापास्त बनले आहे़
पहाटे-सकाळच्या सुमारास हवेत थोडा गारवा असला तरी बाराच्या नंतर अचानक उन्हाचे चटके बसायला सुरूवात होते़ बाजारात लॉकडाऊन असल्याने एक तर गर्दी नसते़ त्यामुळे उन्ह्याची तीव्रता जाणवत नाही़
अंगातून घामाच्या धारा वाहात असल्याने गर्मीचे प्रमाण अधिक वाढलेले असेच जाणवते़ लॉकडाऊन काळात पोलिस सतत रस्त्यावर असतात़ त्यांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे़ सध्या गावागावात लॉकडाऊनमुळे रस्त्यावर कोणीही दिसत नाही़ तसेच मुले क्रिकेट खेळतानांही दिसत नाही़ त्यामुळे मुलांना घरातच बसावे लागत आहे़
गेल्या वर्षापर्यंत उन्हाळा आला की सुटीचे दिवस सुरू झाले असे म्हणावे लागत असत़
अनेकजण सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी नदीपात्रात पोहण्यासाठी अथवा मोकळ्या जागेवर विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळण्यासाठी जात असत, पण यावेळी तशी संधीही मिळत नाही़ बाहेर जाणे सोडा पण स्वत:च्या घरातून बाहेर पडतांना पोलिसांची लाठी आता पाठीत पडेल की नंतर अशीच स्थिती सध्या सर्वत्र आहे़ त्यामुळे थंड पेय लॉकडाऊनच्या गर्तेत सापडले आहेत़
गेल्या २१ दिवसांपासुन घरात राहून कंटाळलेल्या नागरीकांना लॉकडाउन शिथील होण्याची प्रतिक्षा आहे़ परंतु मुख्यमंत्र्यांनी ३० तारखेपर्यंत लॉकडाउन कायम केल्याने चिंता वाढली आहे़
प्रकल्पांमधील सध्याचा जलसाठा
शिरपुरात घराघरात पाण्याची तीव्रता सध्यातरी भासत नसली तरी करवंद धरणाच्या पाण्याच्या पातळीत घट होतांना दिसत आहे़ तीव्र उन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी सध्यातरी घटत आहे़ आजपर्यंत करवंद धरणात ४० टक्के पाण्याचा साठा कागदोपत्री दिसत असला तरी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे़ अनेर धरणात ५८ टक्के पाण्याचा साठा आहे़ अभणपूर धरणात ४५ टक्के, बुडकी १२, गधडदेव २८, जळोद १५, कालीकराड १६, खामखेडा १५, लौकी २२, मिटगांव ५, नांदर्डे ४५, रोहिणी २, विखरण ४, वाडी ७, वकवाड धरणात ७ टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे़

Web Title: Water level reduction in projects in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे