धुळे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची पाणी पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:28 AM2019-02-26T11:28:48+5:302019-02-26T11:29:54+5:30

जिल्हयात १०७ निरीक्षण विहिरी, दर तीन महिन्यांनी होते तपासणी

Water levels of monitoring wells in Dhule district decreased | धुळे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची पाणी पातळी घटली

धुळे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची पाणी पातळी घटली

Next
ठळक मुद्देविहिरींची पातळी २ मीटरने खालावलीदर तीन महिन्यांनी विहिरींची तपासणी

आॅनलाइन लोकमत
धुळे : भूजल सर्वेक्षण विभागाकडून जिल्ह्यातील १०७ निरीक्षण विहिरींची जानेवारी महिन्यात तपासणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील या निरीक्षण विहिरींची पातळी सरासरी २ मीटरने खालावली असल्याचे पहाणीतून दिसून आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्प, विहिरी पूर्ण क्षमतेने भरतील असा पाऊस न झाल्याने, ही स्थिती निर्माण झालेली आहे.
धुळे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५५.३० मि.मी. आहे. जिल्ह्याचा साधारणपणे ९२ टक्के भूभाग आहे. अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. त्यामध्ये कठीण पाषाण, सच्छिद्र पाषाण व मांजरा पाषाण असे प्रामुख्याने स्तर आढळून येत असतात. त्यामुळे भुजलाची उपलब्धता ही प्रामुख्याने पाषाणाची झालेली झीज व त्यात असणाऱ्या फटी व भेगा यावर अलवलंबून असेत. त्यामुळे भुजलाची पातळी निरनिराळ्या क्षेत्रात वेगवेगळी आढळून येत असते.
भूजलस्तर ठरविऱ्यासांी भूजल सर्वेक्षण विभागाककडून जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १०७ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या विहिरींचे वर्षातून चारवेळा म्हणजे तीन महिन्यातून एकदा तपासणी केली जाते.
भूजन सर्वेक्षण विभागाकडून जानेवारी १९ मध्ये १०७ निरीक्षण विहिरींचा जलस्तर तपासण्यात आला. यामध्ये धुळे तालुक्यातील ३३ साक्री तालुक्यातील ३१, शिंदखेडा तालुक्यातील २५ व शिरपूर तालुक्यातील १८ अशा एकूण १०७ निरीक्षण विहिरींचा समावेश आहे. यात जानेवारी १९ मध्ये धुळे तालुक्यातील निरीक्षण विहिरींची पाण्याची पातळी २.४२ मीटरने खालावलेली आहे. तर साक्री तालुक्यातील निरीक्षण विहिरींची पाणी पातळी २ मीटर, शिंदखेडा तालुक्यातील निरीक्षण विहिरींची पाणी पातळी २.७५ व साक्री तालुक्यातील निरीक्षण विहिरींची पाणी पातळी २.६२ मीटरने खालावल्याचे तपासणीत आढळून आलेले आहे.
 

Web Title: Water levels of monitoring wells in Dhule district decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे