गोंदूर गावाच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाण्याची प्रतीक्षा!

By admin | Published: April 10, 2017 04:40 PM2017-04-10T16:40:30+5:302017-04-10T16:40:30+5:30

संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील गोंदूर गाव दत्तक घेतल़े त्यानंतर विकासाची बरीच कामे मार्गी लागली आहेत़

Water Purification Center of Gondur Village Waiting for Water! | गोंदूर गावाच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाण्याची प्रतीक्षा!

गोंदूर गावाच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाण्याची प्रतीक्षा!

Next

 ऑनलाईन लोकमत/देवेंद्र पाठक  

धुळे,दि.10- शहरापासून पाच किलोमीटरवर पश्चिमेला असलेल्या गोंदूर गावात मूलभूत समस्यांनी ग्रामस्थ हैराण होत़े पिण्यासाठी शुद्ध पाणी, आरोग्य, रस्ते, शौचालय अशी माफक अपेक्षा ग्रामस्थ आजही व्यक्त करतात़ प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असताना त्याचेही दुर्लक्ष होत होत़े मात्र केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी आपल्या संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील गोंदूर गाव दत्तक घेतल़े त्यानंतर विकासाची बरीच कामे मार्गी लागली आहेत़ तर काही कामे आजही सुरू आहेत़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र जटिल बनला असून हातपंपावरच ग्रामस्थांची मदार आह़े जलशुद्धीकरण केंद्राचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र तलावात ठणठणाट असल्यामुळे केंद्राचे काम थांबविले आहे. त्यामुळे त्याद्वारे मिळणा:या पाण्याची अद्याप प्रतीक्षा आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी गोंदूर गाव विकासासाठी दत्तक घेतले आह़े गावात काहीअंशी विकास झाला असला तरी अद्यापही काही भाग विकासापासून दूर राहिला आह़े 
शुद्धीकरण केंद्राची गरज
2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 3 हजार 659 इतकी आह़े आजच्या स्थितीत हा आकडा सुमारे 5 हजारांवर पोहचला आह़े संख्या मोठी असल्याने गावक:यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असावी यासाठी गावतलावाची निर्मिती करण्यात आली़ हा तलाव सुमारे अडीच एकर क्षेत्रात पसरलेला आह़े याठिकाणी विहीर तयार केली असून त्याद्वारे पिण्याचे पाणी देण्याची रचना केली आह़े या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य असल्याने ते पाईपाद्वारे टाकीत आणले जात़े त्याठिकाणी पाणी स्वच्छ केले जाते आणि ते नागरिकांना पुरविण्यात येत़े मात्र ते पाणी किती शुद्ध आहे हा कळीचा प्रश्न आह़े यासाठी गोंदूर ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने पाणी शुद्धीकरण केंद्र झाले पाहिज,े अशी मागणी केली होती़ विशेष म्हणजे या मागणीसाठी त्यांचा वेळोवेळी पाठपुरावासुद्धा सुरू होता़ याकडे दुर्लक्ष होत असेल तर शुद्ध पाणी वितरणाबाबत किती गांभीर्याने घेतले जात असेल हा प्रश्न डॉ़ भामरे यांच्या लक्षात आला. त्यांनी जलशुद्धीकरण केंद्राचे रखडलेल्या कामाला प्राधान्य देण्याचे ठरविले. या कामासाठी 1 कोटी 30 लाखांचा खर्च आह़े गावालगत असलेल्या तलावाजवळ हे केंद्र उभारण्यात आलेले आह़े आजच्या स्थितीत केंद्राचे 90 टक्के काम मार्गी लागले असून तलावात पाणीच नसल्यामुळे केंद्राचे काम पुढे सरकलेले नाही़ तलावात नैसर्गिक स्त्रोताच्या माध्यमातून पाणी आल्यानंतर केंद्राच्या कामाला ख:या अर्थाने चालना मिळू शकणार आह़े 
गटारीचे कामही अर्धवट
गोंदूर गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आह़े गावातील बहुतांश ठिकाणी रस्ता चिखलात विलीन झाल्याचे दिसून येत़े सद्य:स्थितीत गावात अंतर्गत रस्ते जवळपास सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात आहेत़ 
शासनाच्या विविध योजना आणि बीआरजीएफ अंतर्गत रस्ते बांधण्यात आल़े आवश्यक तेथे सिमेंटचे रस्ते आहेत़ पण, त्यांची देखभाल दुरुस्ती वेळोवेळी करणे आवश्यक आह़े सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी 14 ते 15 लाखांची योजना राबविण्यात आली आणि त्यातून गटारीच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली़ 
निम्म्यावर काम झालेले आह़े केवळ काही भाग निधीअभावी रखडलेला असल्याचे स्पष्ट झाले. निधी मिळाल्यास गटारीचे काम मार्गी लागू शकत़े 
 
संसद आदर्श ग्राम योजनेतंर्गत विविध विभागाची विकास कामे गावात गतीने मार्गी लावली जात आह़े जलशुध्दीकरण केंद्र, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, विद्युत पोल उभारणे अशी बरीच कामे झाली आहेत़ असे असताना सीएसआर अंतर्गत गावातील काँक्रीट रस्ते, विमानतळाला लावण्यात येणारी ग्रामपंचायतीची कर आकारणी, गावातील ज्या घरांना सिटी सव्र्हे नंबर मिळालेला नाही, तो मिळावा अशा विविध प्रकारची कामे या योजनेतंर्गत झाली पाहीज़े ही योजना खूपच उत्तम असून पुढेही ती सुरु राहणे अपेक्षित आह़े 
- राजेंद्र दगा भदाणे  माजी सरपंच, गोंदूर

Web Title: Water Purification Center of Gondur Village Waiting for Water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.