अमरावती प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:58 AM2020-09-29T11:58:40+5:302020-09-29T11:59:06+5:30
प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
आॅनलाइन लोकमत
मालपूर (जि.धुळे) :शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षी भरला आहे. प्रकल्पात पाण्याचा ओघ सुरूच असल्याने, २८ रोजी दुपारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून १२० क्युसेस पाणी अमरावती नदीपात्रातील सांडव्यात सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आला आहे.
मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने वाया जाणाºया पाण्यातून तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी आधीच उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. मात्र पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे पाणी पातळी २२५.७० वर पोहचली व या प्रकल्पाची सिंचन क्षमता एवढीच असल्याने सोमवारी या प्रकल्पाच्या अमरावती नदी पात्रातील सांडव्यात दोन दरवाजे उघडुन १२० क्युसस े पाणी सोडण्यात आल.े
या प्रकल्पाला दोन कालवे आहेत. डाव्या कालव्यात ३६ क्युसेस व उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग याआधीच सोडण्यात आला आहे. तरी देखील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदी पात्रा लगतच्या शेतकº्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सध्या अमरावती मध्यम प्रकल्पातुन एकुण २०६ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पाऊस झाल्यास विसर्गात वाढ करण्यात येईल असे या प्रकल्पाचे अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.