जलपुर्नभरण करणे काळाची गरज... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:28 PM2019-07-19T23:28:13+5:302019-07-19T23:28:33+5:30

पाणी हा आजचा ज्वलंत विषय आहे.गेल्या तीन ते चार वर्षा पासून सतत चा दुष्काळ आणि या वर्षी देखील शहरासह ...

Water requirement needs time. | जलपुर्नभरण करणे काळाची गरज... 

जलपुर्नभरण करणे काळाची गरज... 

googlenewsNext


पाणी हा आजचा ज्वलंत विषय आहे.गेल्या तीन ते चार वर्षा पासून सतत चा दुष्काळ आणि या वर्षी देखील शहरासह जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही. या वर्षी देखील दुष्काळाचे सावट गडध आहे. सर्वत्र पाण्यासाठी वन वन भटकण्याची वेळ आज आली आहे. या ला कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात निसगार्चा ढासळनारा समतोल, बेसुमार होणारी वृक्ष तोड एक ना अनेक कारण आपल्या समोर आहेत.पाणी बचतीची संकल्पना अजूनही आपण स्वीकारलेली नाही. जलपुनर्भरण यावर अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकते.  सगळीकडे शहरी किंबहुना  ग्रामीण भागात देखील सर्वत्र सिमेंट कॉंक्रेटीकरणामुळे पाणी वाहून जाते.परिणामी जलपुनर्भरण होत नसल्यामुळे आज जमिनीची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. जलपुर्नभरणाची संकल्पना कृतीत येणे गरजेचे आहे.यासाठी सर्वात सुलभ उपाय म्हणजे रेनवॉटर हॉर्वेस्टिंग या माध्यमातून जनजागृती करून इमारती, घरांच्या छतावर चे पाणी एकत्र साठवून शोष खड्याच्या माध्यमातून जमिनीत जिरवायला हवे परिणामी जलपुनर्भरण होऊन आसपासच्या विहिरी, कूपनलिका यांची जलपातळी वाढण्यास मदत होईल आज पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून जलभरणाचे उत्तम कामे सर्वत्र होत असताना पावसाळ्यात येत्या काळात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जलपुनर्भरण म्हणून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रयोग मोठ्या प्रमाणवर अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पाणी बचतीसाठी उद्याच्या भविष्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
   - सुरेश थोरात
धुळे 

Web Title: Water requirement needs time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे