धुळ्यात राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:27 PM2017-11-06T16:27:13+5:302017-11-06T16:29:23+5:30

महिलांच्या अवमानप्रकरणी महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी

Water Resources Minister Girish Mahajan's image of Dhanlal Deshpande Congress | धुळ्यात राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा 

धुळ्यात राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा 

Next
ठळक मुद्देमंत्री महाजन यांच्या वक्तव्याचा महिला राष्टÑवादी काँग्रेसतर्फे निषेधसरकारविरूद्ध केली घोषणाबाजीअनेक महिलांनी व्यक्त केल्या संतप्त भावना



आॅनलाईन लोकमत
धुळे : दारूच्या ब्रॅँडला महिलांचे नाव दिले तर जास्त खप होईल, असे वक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा येथे राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला. सोमवारी दुपारी शहरातील महाराणा प्रताप चौकात मंत्री महाजन यांच्या  प्रतिमेला शेण आणि चपलांचा मार देत आपला रोषही व्यक्त केला. तसेच त्यांच्या  राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी वरील वक्तव्य केले होते. कारखान्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या ब्रॅँडला महिलांचे नाव दिल्यास त्याचा जास्त खप होईल, असा उघड सल्ला त्यांनी यावेळी जाहीर भाषणातून दिला. महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करून त्यांनी तमाम महिलावर्गाचा अवमान केला आहे. आपणही एका मातेच्या पोटी जन्माला आलेलो आहोत, याचे भानही ते यावेळी विसरले. सत्तेच्या धुंदीत भाजपच्या नेत्यांची जीभ वारंवार घसरत असून मंत्री महाजन हे त्या पैकीच एक वाचाळवीर असल्याचा आरोप राष्टÑवादीच्या महिला पदाधिकाºयांनी केला.  राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांच्या नेतृत्वात महिलांनी त्यांच्या प्रतिमेला शेण व चपलांचा मारा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. 
यावेळी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती इंदू वाघ, युवती जिल्हाध्यक्षा मीनल पाटील, धुळे तालुकाध्यक्षा सुमित्रा चौधरी, शिंदखेडा तालुकाध्यक्षा प्रियंका पाटील  यांच्यासह राधिका ठाकूर, आरती पवार, कल्पना गवळी, मालती पाडवी, शफीन बक्श, फातिमा अन्सारी, वंदना पाटील, सुवर्णा बेहरे, निरू शर्मा आदी उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी मंत्री महाजन व भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून बेताल वक्तव्य करणाºया महाजन यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. 


 

Web Title: Water Resources Minister Girish Mahajan's image of Dhanlal Deshpande Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.