उजव्या कालव्यातून पाणी नासाडी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:05 PM2020-04-21T22:05:46+5:302020-04-21T22:06:04+5:30

अमरावती प्रकल्प : सोडलेले पाणी जाते कुठे याचे कुतूहल शेतकऱ्यांना होते

The water from the right canal stopped wasting | उजव्या कालव्यातून पाणी नासाडी थांबली

उजव्या कालव्यातून पाणी नासाडी थांबली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर :अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद करून ते प्रकल्पातच अडविण्यात आले आहे. त्यामुळे उजव्या कालव्यातून होणोरी पाण्याची नासाडी थांबली आहे.
अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याची नासाडी या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतली आहे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबांचे महत्त्व मालपूरकरांनी मागच्यावर्षी अनुभवले आहे. नळांना वीस दिवसानंतर तेही घड्याळ्याच्या काट्यावर लक्ष ठेवून पाणी सोडले जात होते.
तरी सुध्दा याच्यातून कुठलाही बोध न घेता गेल्या बºयाच दिवसांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातून बेसुमार पाणी पाटबंधारे विभागाने सोडुन पाण्याची नासाडी होत होती. हे पाणी शेतशिवारातील नाल्यातून देखील वाहत होते. यावरून सुराय ग्रामस्थांमध्ये वाद झाला. तो थेट दोंडाईचा पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला तरी कोणी ही याची दखल घेतली नाही. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.
मालपुर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून याला दोन कालवे आहेत. शेतकऱ्यांचा खरिप व रब्बी दोन ही हंगामातील पिक आता निघाले आहेत. काहींची काढणी चालु आहे. अशा परिस्थितीत पाण्याची गरज नसतांना हे एवढे पाणी कुठे जात आहे याचे ग्रामस्थांना मोठे कुतुहल होते. शेतकºयांनी याबाबत कैफियत मांडली.
पाण्याचा साठा प्रकल्पात राहिल्यास याचा भविष्यात उपयोग घेता येवू शकतो, यासाठी प्रकल्पात पाणी साठा असणे आवश्यक आहे अन्यथा आडातच नाही तर पोह?्यात कुठुन येईल अशी अवस्था होवू नये म्हणून काही जागृत शेतक?्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर वाया जाणाºया पाण्याला पायबंद बसला आहे.

Web Title: The water from the right canal stopped wasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे