‘बुराई’तून अवैध वाळू उपसामुळे ुनिर्माण झाले पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 09:59 PM2019-02-03T21:59:45+5:302019-02-03T22:00:01+5:30
बुराईच्या पात्रातून बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे,खलाणे, निशाणे या गावात वाळू उपशा मुळे पाण्याची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातून रात्रीतून ट्रॅक्टरद्वारे बुराईच्या पात्रातून बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा केला जातो. यामुळे नदी काठावरील विहीरींनीही तळ गाठला आहे. परिसरात आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळू उपसासंदर्भात तक्रार करुनही कोणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे.
परिसरातून रात्रीच्या वेळी बुराई पात्रातून बेकादेशीररित्या वाळू उपसा करुन तो ट्रॅक्टरद्वारे नेला जातो. सर्रासपणे होणाºया वाळू चोरीकडे तक्रार करुनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. नागरिक स्वत: कॉल करून अधिकाºयांना जागृत करत असतात. परंतु तरीही अजून एक ही अधिकारी बुराई नदीत आलेला नाही उलट उडवा उडवीची उत्तरे दिली जातात अशी नागरिकांची तक्रार आहे.
परिसरातील पाण्याचा प्रश्न दिवसे दिवस वाढत असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहण्यााची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे शिंदखेडा हे चिरणे व निशाणे गावच्या जवळ असून दुर्लक्ष करून दिली जाते वाळू उपसा सर्रास चालू असताना; या बाबतीत गांभीयार्ने दखल घ्यावी गावात वाळू माफियांनी एक प्रकारे दहशत निर्माण केली गावातील नागिरक हैराण झाले आहेत. यावर प्रशासन ला जाग कधी येईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बुराई बारमाही करण्यासाठी शिंदखेडा तालुक्याचे आमदार व पर्यटन मंत्री जयकुमार रावल सतत प्रयत्न करीत असून दुसरीकडे अवैध वाळू उपसा हा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून चालू असल्याने बुराई नदीतील पाणी पातळी खोल गेल्याने नागरिकाना पाण्याच्या प्रश्न उद्भवत आहे. या वर तरी विचार करण्याची गरज येथे दिसत आहे. जो पर्यंत कारवाई केली जात नाही. तो पर्यंत वाळू उपसा बंद होणार नाही.
वाळू उपसा करणाºया माफिया वर दंड वसूल करण्यात यावा व ताबडतोब कठोर कारवाई करण्यात अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.