तळोदा बसस्थानकात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 12:12 AM2016-01-25T00:12:28+5:302016-01-25T00:12:28+5:30
बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने हाल कायम आहेत़
तळोदा : शहरातील बसस्थानकावर निर्माण झालेल्या समस्या संपत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत़ बसस्थानकावर प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने हाल कायम आहेत़ वेळोवळी तक्रारी करूनही तळोदा बसस्थानकावरील समस्यांचे निमरूलन होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आह़े आदिवासी विकास विभागाकडून आधुनिकीकरणासाठी लाखो रुपये निधी प्राप्त झालेल्या तळोदा बसस्थानकाचा कायापालट झाल्याचा दावा काही दिवसांपूर्वी एस़टी़ महामंडळाकडून करण्यात येत होता़ मात्र स्थानकात समस्या ‘जैसे थे’ असल्याने महामंडळाचा दावा फोल ठरत आह़े स्थानकात बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत़ बसस्थानकातील निर्माण झालेल्या समस्या सोडवण्याची मागणी करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने तळोदा शहरातील नागरिक व बाहेरगावाहून येणारे नागरिक यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आह़े (वार्ताहर) 4तळोदा बसस्थानकातील जलकुंभ आणि सार्वजनिक पाणपोई यांना पाणीपुरवठा करणारी मोटार गेल्या महिनाभरापूर्वी जळाली आह़े ही मोटार दुरुस्त करण्याबाबत परिवहन महामंडळाच्या कर्मचा:यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आह़े जळालेली मोटार दुरुस्तीसाठी धुळे येथे पाठवण्यात आल्याचे तळोदा बसस्थानकावरील कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े मात्र महिना होऊनही मोटार दुरुस्त झालेली नाही़ बंद पडलेल्या मोटारीमुळे स्थानकात पाण्याचे दुर्भिक्ष्य आह़े बसस्थानकात पाणी मिळत नसल्याने पाणी विकत न घेऊ शकणारे खेडय़ापाडय़ावरील नागरिक बसस्थानकाबाहेर जाऊन पाणी पितात़ पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहात पाणी नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत़ स्वच्छतागृहांमध्ये पाणी टाकले जात नसल्याने दरुगधी पसरली आह़े यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आह़े 4रात्री व पहाटेच्या सुमारास गुजरात राज्यात जाणा:या व येणा:या लांब पल्ल्याच्या बसेस तळोदा बसस्थानकात येतात़ या बसेसमधील प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांना थांबून राहावे लागत असल्याचे चित्र गेल्या महिनभरापासून दिसून येत आह़े