शिंदखेडा तालुक्यात एप्रिलपासून ५ गावांना टँकरने पाणीपुरवठा; सद्या १५गावात विहीर अधिग्रहणाने पाणी पुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:29 PM2023-02-28T19:29:24+5:302023-02-28T19:29:36+5:30

शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी संभाव्य पाणी टंचाईची बैठक जि. प. सभापती महावीरसिंह रावल यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली.

Water supply by tanker to 5 villages in Shindkheda taluka from April | शिंदखेडा तालुक्यात एप्रिलपासून ५ गावांना टँकरने पाणीपुरवठा; सद्या १५गावात विहीर अधिग्रहणाने पाणी पुरवठा सुरू

शिंदखेडा तालुक्यात एप्रिलपासून ५ गावांना टँकरने पाणीपुरवठा; सद्या १५गावात विहीर अधिग्रहणाने पाणी पुरवठा सुरू

googlenewsNext

राजेंद्र शर्मा

धुळे - शिंदखेडा तालुक्यात मंगळवारी संभाव्य पाणी टंचाईची बैठक जि. प. सभापती महावीरसिंह रावल यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आली.बैठकीत सद्या तालुक्यातील १५ गावात विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच एप्रिलपासून ५ गावात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे उपअभियंता बिरारी यांनी सांगितले. 

तालुक्यात ५० गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी विहिरी अधिग्रहण करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.  बैठकीत धुळे जि. प. चे कोणीच अधिकारी हजर नसल्याने सभापती रावल सह उपस्थित मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली.सेच टंचाईचा गंभीर प्रश्नाबाबत बोलविलेल्या बैठकीत अनेक ग्रामसेवक गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची सुचना करण्यात आली. 
बैठकीचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी देवरे यांनी केले तर आभार उपअभियंता बिरारी यांनी मानले.

Web Title: Water supply by tanker to 5 villages in Shindkheda taluka from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.