धुळे शहराला पांझरा नदीपात्रातून पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:47 AM2018-02-26T11:47:58+5:302018-02-26T11:47:58+5:30

पाणी वाचविण्यासाठी मनपाची धडपड, दहा गावांच्या पाणीपुरवठ्याचे आव्हान

Water supply to Dhule city from Panjhra river bed | धुळे शहराला पांझरा नदीपात्रातून पाणीपुरवठा सुरू

धुळे शहराला पांझरा नदीपात्रातून पाणीपुरवठा सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे- शहर हद्दवाढीमुळे दहा गावांना पाणीपुरवठ्याचे आव्हान- नकाणे तलावातून पाणीपुरवठा आठ दिवसांपासून बंद- नकाणे तलावात केवळ १०० दिवसांचा पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी धुळयात दाखल झाल्यामुळे नकाणे तलावातून आठ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे़ पांझरा नदीपात्रातून पाणी उचलून शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली़
शहराला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो़ त्यामुळे जून, जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान मनपासमोर असते़ गेल्या वर्षी जुन महिन्यातही पावसाचे आगमन न झाल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून ऐनवेळी पाणी घेण्याची वेळ मनपा व पाटबंधारे विभागावर आली होती़  त्यामुळे यंदा अक्कलपाडा प्रकल्पातून पहिले आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते धुळयात पोहचताच मनपाने नदीतून पाणी उचलण्यास सुरूवात केली आहे़ हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्राजवळून पाणी पंपिंग केले जात आहे़ परिणामी, नकाणे तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे़ यंदा शहर हद्दवाढीमुळे मनपाला १० गावांना पाणीपुरवठा करण्याचे आव्हान असणार आहे़ त्यामुळे पाणी वाचविण्यावर भर दिला जात आहे़ सद्यस्थितीत नकाणे तलावात १०० दिवस पुरेल इतका जलसाठा उपलब्ध आहे़ तापी जलवाहिनीवरून शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा होत असून नकाणे तलावातून उर्वरीत ४० टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो़ सद्यस्थितीत तापी नदीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज २ एमएलडी पाणी लागत असून सद्यस्थितीत ४ ते ६ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे़ १३६ कोटींच्या पाणी योजनेतून शहरात जलवाहिन्यांसह जलकुंभांची संख्या वाढल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे़ पाणी योजनेतून ८ व मनपाने स्वत: २ नवीन जलकुंभ उभारले आहेत़ 
 

Web Title: Water supply to Dhule city from Panjhra river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.