पाणीपुरवठा योजनांची वीज कापणार!
By admin | Published: February 6, 2017 12:03 AM2017-02-06T00:03:34+5:302017-02-06T00:03:34+5:30
महावितरण : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र, तब्बल 51 कोटी रुपये थकले
धुळे : वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या वीज महावितरण कंपनीने राज्यभरात वसुलीची धडक मोहीम सुरू केली आह़े त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांपोटी 51 कोटी रुपयांचे वीज बिल थकल्याने महावितरणने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका:यांना पत्र देऊन थकबाकी भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना द्यावे, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा दिला आह़े
वीज देयक थकीत असलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत़ त्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आह़े दरम्यान, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांपोटी थकीत असलेले वीज देयक सर्वाधिक असल्याने आता पाणीपुरवठा योजना महावितरणच्या ‘रडार’वर आहेत़ शहर व जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या योजना ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येतात़ या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो़ पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला सहज शक्य होत नाही़ मात्र त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीचा डोंगर वाढतच असल्याने महावितरणला थकबाकीसाठी पावले उचलावी लागणार होती़ त्यामुळे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील चारही प्रादेशिक संचालक व 16 परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच या कामात कुचराई करणा:यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्यभरात वीज देयक थकीत असलेल्यांवर कारवाई केली जात आह़े जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी घेण्यात आलेल्या वीज कनेक्शनची संख्या 1 हजार 99 इतकी आह़े जिल्ह्यात चार तालुक्यांमध्ये एकूण 11 उपविभाग असून त्यापैकी शिरपूर 2 या उपविभागात सर्वाधिक 9 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी पाणीपुरवठा योजनांपोटी आह़े दरम्यान, महावितरणने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना पत्र दिले आह़े या पत्रानुसार, जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींकडे 51 कोटी 57 लाख रुपयांचे वीज देयक थकले आहेत़ वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतींकडून वीज देयके भरण्यात आलेली नाही़ महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने संबंधित ग्रामपंचायतींना सार्वजनिक पाणीपुरवठय़ाची थकीत वीज देयके भरण्यास सूचित कराव़े ग्रामपंचायतींना वेळोवेळी नोटिसा दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसून थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाईल, याबाबत ग्रामपंचायतींना सूचित करण्यात आले आह़े त्यामुळे आता या पत्रावर जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह़े प्रत्यक्षात ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती दिली जात नसल्याने जिल्हा परिषद प्रशासन अनेक बाबतीत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत़े
महावितरणने तोडले 465 वीज कनेक्शऩ़़
महावितरण कंपनीकडून थकबाकीदार घरगुती, वाणिज्य व कृषी ग्राहकांवरदेखील कारवाई केली जात आह़े त्यानुसार आतार्पयत 465 कनेक्शनचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े 54 लाख 60 हजार रुपयांच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आह़े थकबाकीदारांनी तत्काळ वीज देयके भरावीत, असे आवाहन करण्यात आले आह़े