बुधवारी  १९२ अहवाल पॉझिटिव्ह, आठ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 07:49 PM2020-08-26T19:49:34+5:302020-08-26T21:43:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : बुधवारी  १९२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला.  मृतांमध्ये, धुळे शहरातील ...

On Wednesday, 192 reports were positive, eight patients died | बुधवारी  १९२ अहवाल पॉझिटिव्ह, आठ रुग्णांचा मृत्यू

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बुधवारी  १९२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला.  मृतांमध्ये, धुळे शहरातील तीन, धुळे तालुक्यातील कापडणे, सोनगीर व शिंदखेडा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी रात्री  दोंडाईचा व शिरपूर येथील रुग्णाचा मृत्यू झाला होता. 
बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील १०१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच धुळे तालुक्यातील ३१, शिंदखेडा तालुक्यातील तीन, शिरपूर तालुक्यातील ३९ व साक्री तालुक्यातील १८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ७ हजार ६७० इतकी झाली आहे.

 

Web Title: On Wednesday, 192 reports were positive, eight patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.