बुधवारी ४२ अहवाल पॉझिटिव्ह, एका रूग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 08:14 PM2020-09-30T20:14:55+5:302020-09-30T20:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ४२ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले व एका बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला. धुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील आणखी ४२ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले व एका बाधीत रूग्णाचा मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील वार येथील ४४ वर्षीय रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील १९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ३०९ इतकी झाली आहे. तर ३६२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़
जिल्हा रुग्णालय धुळे येथील ११९ अहवालांपैकी ९ अहवाल पॉझिटिव्ह आले. साई एकता कॉलनी १, बडगुजर प्लॉट २, रेऊनगर १, साक्री रोड १, चितोड रोड १, वाडीभोकर १, नगाव १, फागणे १
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २० अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले.
पटेल कॉलनी १, चिमठाणे शिंदखेडा २
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ५० अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले.
चंद्रनगरी २, मराठा गल्ली १, शास्त्री नगर १, दादूसिंग कॉलनी १, आमोदे १, विखरण १
भाडणे साक्री येथील १५ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
इंदिरा नगर सामोडे १, विठ्ठल मंदिर सामोडे २, योगेश कॉलनी दहीवेल १, सटाणा रोड पिंपळनेर १
महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ५६ अहवालांपैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
अहिल्यादेवी नगर २,अजबे नगर १, सिद्धार्थ नगर चितोड रोड २, मोहाडी ३, वलवाडी २, पंचवटी टॉवर १, जयहिंद कॉलनी १, बोरसे नगर १, मनपा १, वृंदावन कॉलनी १
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ११ अहवालांपैकी २ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.
बिवडी १, धुळे इतर १
खाजगी लॅब मधील १४ अहवालापैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आले.
विनोद नगर वलवाडी शिवार १