रक्तदानाने केले नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:02 PM2019-01-01T22:02:54+5:302019-01-01T22:03:56+5:30

३४ वे वर्ष : युवक बिरादरी व रक्ताश्रय संस्थेचा उपक्रम

Welcome to the New Year in Blood Donation | रक्तदानाने केले नववर्षाचे स्वागत

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील युवक बिरादरी व रक्ताश्रय संस्थेतर्फे यंदा ३४ व्या वर्षीही नववर्षाचे स्वागत रक्तदानाने करण्यात आले़ ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजता अर्पण रक्तपेढी येथे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला़
जिल्ह्यात गेल्या ३४ वर्षांपासून रक्तदान करण्याचा विक्रम युवक बिरादरी व रक्ताश्रय संस्थेच्या नावे आहे़ यंदा झालेल्या रक्तदान शिबीरात सायंकाळी ७ वाजल्यापासून रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, युवक बिरादरी व रक्ताश्रय संस्थेने रक्तदानाच्या कार्यात केलेल्या भरीव कामामुळे जिल्हा आत्मनिर्भर झाला आहे़ या शिबीरात माजी आमदार प्रा़ शरद पाटील, ईश्वर पाटील, संजय ढवळे, विजय बोरसे, योगेश हिरे, पंकज भोई, योगेश अग्रवाल, विनोद कुटे, परवेज पठाण, धिरज पाटील, वाल्मीक मोरे, योगेश अहिरे, मनोज शर्मा, यश शर्मा, राजेंद्र पाटील उपस्थित होते़

Web Title: Welcome to the New Year in Blood Donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे