सेवानिवृत्त जवानाचे  धमाणे गावात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:58 AM2019-08-14T11:58:09+5:302019-08-14T11:58:29+5:30

शोभायात्रा काढली : ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार

Welcome to Retired Jawaan village | सेवानिवृत्त जवानाचे  धमाणे गावात स्वागत

गावातून या योगेश पाटील यांच्या  पत्नी मयुरी पाटील, वडील बन्सीलाल पाटील व भाऊ राकेश पाटील आदी

Next

धमाणे :धुळे तालुक्यातील धमाने येथील रहिवासी भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान योगेश पाटील याचा धमाने ग्रामस्थांनी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली  व   सत्कार करण्यात आला.
 धमाणे येथील बन्सीलाल  पाटील यांचे चिरंजीव योगेश  पाटील यांनी सलग सतरा वर्ष भारतीय  सैन्यदलात श्रीनगर, झाशी, पंजाब आदी क्षेत्रांमध्ये  सेवा बजावली. आपल्या सतरा वर्षाच्या कारकिर्दीत  मध्ये त्यांनी शिपाई पासून  नायक पदापर्यंत बढती घेतली. नायक पदावरून  सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या परिवारासह आपल्या मुळगाव धमाणे येथे परतले. 
ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा परिवारासह गावातून खुल्या जीपमध्ये शोभायात्रा  काढण्यात आली. यात्रेचा समारोप झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात  योगेश पाटील यांचा सपत्नीक  जाहीर सत्कार देखील करण्यात आला.

Web Title: Welcome to Retired Jawaan village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे