साक्रीत पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविकेला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:12 PM2018-04-05T15:12:45+5:302018-04-05T15:12:45+5:30

एसीबीची कारवाई : पंचायत समितीच्या आवारातील घटना

When Sakri caught five thousand rupees after taking a bribe, the villager caught him | साक्रीत पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविकेला पकडले

साक्रीत पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविकेला पकडले

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्यासाठी लाचेची मागणीलाभार्थीने धुळे एसीबीकडे केली होती तक्रारपथकाने आज सापळा लावून ग्रामसेविकेस रंगेहात पकडले

आॅनलाइन लोकमत
साक्री (जि.धुळे) : प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्यासाठी झिरणीपाडा येथील लाभार्थीकडून पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पंचायत समितीच्या आवारात रंगेहात पकडण्यात आले. कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तालुक्यातील झिरणीपाडा येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मंजूर  झालेल्या घरकुलाचे पहिले दोन हप्ते मिळाल्यानंतर शासनाकडून आलेला तिसरा हप्ता देण्यासाठी ग्रामसेविका गीता बैरागी यांनी   लाभार्थीकडून पाच हजाराची लाच मागितली. 
तेव्हा लाभार्थीने यासंदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार   गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या पथकाने पंचायत समिती आवारात सापळा रचला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पंचायत समितीच्या आवारातच ५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यासंदर्भात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


 

Web Title: When Sakri caught five thousand rupees after taking a bribe, the villager caught him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे