1500 रूपयांची लाच घेतांना धुळे येथे लिपीक जाळ्यात
By admin | Published: April 13, 2017 04:41 PM2017-04-13T16:41:26+5:302017-04-13T16:41:26+5:30
1500 रुपयांची लाच घेताना धुळे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक विजय बाळकृष्ण शिरसाठ यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Next
धुळे,दि.13- शैक्षणिक संस्थेच्या कामकाजाच्या रेकॉर्ड प्रोसेडींगची प्रमाणित प्रत देण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेताना धुळे सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक विजय बाळकृष्ण शिरसाठ यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरूवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली़
साहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक विजय शिरसाठ यांनी तक्रारदार यांना 3 हजार 500 रूपयांची शासकीय पावती न देता वरचेवर 1 हजार 500 रूपये लाचेची मागणी करत होत़े त्यामुळे तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली़ न्यानुसार पडताळणी करून 13 एप्रिल रोजी सकाळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सापळा लावून एसीबीच्या पथकाने विजय शिरसाठ यांना तक्रारदार यांच्याकडून 1 हजार 500 रूपयांची लाच स्विकारल्यानंतर रंगेहात पकडल़े याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होत़े
उपअधीक्षक सुनिल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेककर व पथकातील पो़ह़ेकाँ जितेंद्र परदेशी, किरण साळी, कैलास शिरसाठ, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, देवेंद्र वेन्दे, संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, सतीष जावरे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, संदीप कदम यांनी केली़