लाच घेताना त्रिकूट जाळ्यात

By admin | Published: February 3, 2017 01:04 AM2017-02-03T01:04:18+5:302017-02-03T01:04:18+5:30

दुय्यम निबंधक कार्यालयात कारवाई

When taking a bribe, Trikuta Jets | लाच घेताना त्रिकूट जाळ्यात

लाच घेताना त्रिकूट जाळ्यात

Next

साक्री :  दूध डेअरीसाठी जमीन   खरेदीत दोन लाखांची लाच घेणा:या प्रभारी दुय्यम निबंधक परशुराम अहिरे यांच्यासह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. गुरुवारी सायंकाळी साक्रीतील दुय्यम निबंधक कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. 
तक्रारदार यांना दिघावे (ता़साक्री) शिवारातील दूध डेअरी व  लगतची 3 एकर जमीन खरेदी करावयाची होती़ त्यासाठी दुय्यम निबंधक परशुराम काशिनाथ अहिरे (वय 50) व कनिष्ठ लिपिक अशोक ईश्वरलाल सोनकांबळे यांनी  रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी सहा लाख रुपये लाचेची मागणी केली़ तडजोडीनंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने  धुळे एसीबी यांच्याकडे तक्रार केली़

एसीबीने गुरुवारी सायंकाळी साक्री  दुय्यम निबंधक कार्यालयात   सापळा लावला़ (पंटर) दीपक कृष्णा ठाकूर याने दोन लाख रुपये लाच घेताच पथकाने तिघांना रंगेहाथ पकडले.

Web Title: When taking a bribe, Trikuta Jets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.