शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण ? महापालिका : नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली तर चोरट्यांना ‘अभय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:05 PM2019-04-12T22:05:06+5:302019-04-12T22:05:26+5:30

डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय

 Who is scared of water in the city? Municipal corporation: Recovery of water tax from citizens and 'Abhay' for thieves | शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण ? महापालिका : नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली तर चोरट्यांना ‘अभय’

dhule

Next

धुळे : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ तर दुसरीकडे मात्र व्हॉल्व गळत्यांव्दारे नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर सर्रासपणे डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय दिले जात आहे़
दीड महिना पुरेल एवढाच जलसाठा
महापालिकेतर्फे तापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम साठा आहे़ नकाणे तलावात केवळ ३५ ते ४० एमसीएफटी पाणीसाठा होता. त्याची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून त्यात सद्यस्थितीत केवळ १२८ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध आहे.
नियोजनाचा पूर्ण अभाव
तापी जलवाहिनीवरील १६ गळत्यांची दुरूस्ती काही दिवसापुर्वी करण्यात आली होती़ दुरुस्तीनंतर शहरातील काही प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र अद्याप काही प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे़ शहरात सुरळीत पाणीपुरवठा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़
हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया
मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ बुधवारी शहराला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोंखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी नदीपात्रात वाहून वाया जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील पाण्याचा उपयोग वरखेडीसह परिसरातील स्थानिक नागरिकांसह विटा भट्टीसाठी केला जातो. त्यासाठी व्हॉल्व लिकेज करण्यात येतो़ व्हॉल्व दुस्स्तीनंतर पाणी चोरी करणाºया नागरिकांना महापालिका पथकाने गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे़
पाण्याचा वापर वाढला!
शहराचा वाढता विस्तार पाहता मनपाला दरवर्षी जलस्त्रोतांमधील आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज भासत आहे़ वाढती लोकसंख्या व जीर्ण जलवितरण यंत्रणा व पाण्याचा अपव्यय यांमुळे पाण्याची मागणी, वापर वाढत आहे़
पाणीचोरी रोखण्याचे आव्हान
महापालिकेला शहराला करावयाच्या पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला आहे. त्यासाठी शहरासह परिसरातील अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सदोष पाणीपट्टी आकारणीवरही कटाक्ष टाकणे आवश्यक आहे़
शहरातील अवैध नळधारकांकडे दुर्लक्ष करीत नियमित पाणीपट्टी भरणाºया नागरिकांवरील बोजा वाढल्यास मनपाविरोधात तीव्र रोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे.

Web Title:  Who is scared of water in the city? Municipal corporation: Recovery of water tax from citizens and 'Abhay' for thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे