पत्नीची आत्महत्या पतीविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 09:53 PM2020-05-24T21:53:36+5:302020-05-24T21:53:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारे येथे कालीदास तोताराम भावसार (६५) याने दारु पिण्यासाठी आणि मांसाहार करण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी करीत पत्नी रत्नाबाई (६०) हीला मारहाण, शिवीगाळ करुन छळले़ पतीकडून होणारा त्रास सहन न झाल्याने तीने १५ मे रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते़ त्यात तिचा मृत्यू झाला़
याप्रकरणी हिरालाल बाबुलाल भावसार (४९, रा़ धानवड ता़ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कालीदास भावसार याच्याविरुध्द साक्री पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
फिर्यादीत म्हटले आहे की, १५ मे पूर्वी सतत दोन महिने छळ करण्यात आल्याने रत्नाबाईने पेटवून घेतले़ धुळे रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला़ छळ सहन न झाल्याने तीने जीवन संपविले़