... तर शेतजमीनींचा ताबा देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:02 PM2020-01-28T12:02:53+5:302020-01-28T12:03:33+5:30
शेतकऱ्यांचा इशारा : सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेचे भूसंपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : योग्य मोबदला मिळाला नाही तर शेतजमीनींचा ताबा देणार नाही, असा ईशारा सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे.
सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी शेतजमीनी संपादीत करण्याची प्रक्रीया सुरू आहे. प्रकल्पबाधित शेतकºयांपैकी शिंदखेडा तालुक्यातील सोंडले आणि धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे या गावातील शेतकºयांनी हरकती दाखल केल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, संपादीत होणाºया शेतजमीनींवर ७ ते ८ वर्षांपासून फळबागायत आहे. डाळींब तसेच आंब्याची लागवड केलेली आहे. सातबारा उताºयांवर पिकपेरा लावला असून फळांची चांगल्या दराने विक्री करुन दरवर्षी उत्पन्न घेतलेले आहे. दरवर्षी उत्पन्न देणारी शेतजमीन शासनाने घेतली तर शेतकरी भूमिहीन होवून त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हिरावले जाणार आहे.
या शेतकºयांना तसेच त्यांच्या वारसांना अन्य कोणताही व्यवसाय नाही. शेतांमध्ये विहीर, बोअर असून पाईपलाईन तसेच ठिबक संच बसविलेले आहेत.
त्यासाठी शेतकºयांनी बँकेसह खाजगी कर्ज देखील घेतले आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित शेतकरी कर्जबाजारी आहेत.
वस्तुस्थिती विचारात घेता आम्हाला योग्य मोबदला मिळावा. अन्याय झाला तर आंदोलन, उपोषण करण्यात येईल, असा ईशारा धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकºयांनी निवेदनात दिला आहे. आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.
धुळे तालुक्यातील बाबरे, वेल्हाणे आणि शिंदखेडा तालुक्यातील सोंडले येथील ३५ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे आपली व्यथा मांडली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संजय पाटील, वसंत पाटील, वंदन गुजर, संजय बडगुजर, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, वाल्मीक राजपूत, एकनाथ पाटील, रमेश राजपूत, अशोक राजपूत, अर्जुन पवार आदी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेत संपादीत होणाºया शेतजमीनींचे व फळझाडांचे मुल्यांकन करावे, बाजार भावानुसार दर निश्चित करावा आणि मोबदला द्यावा अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.