माळमाथा भागाकरिता रुग्णवाहिका मिळेल का ? रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:28 AM2021-05-30T04:28:10+5:302021-05-30T04:28:10+5:30

दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सात उपकेंद्र जोडून आहे आणि सोबत २९ गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे या भागांची लोकसंख्या साधारणपणे ...

Will there be an ambulance for Malmatha area? Ambulance | माळमाथा भागाकरिता रुग्णवाहिका मिळेल का ? रुग्णवाहिका

माळमाथा भागाकरिता रुग्णवाहिका मिळेल का ? रुग्णवाहिका

Next

दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सात उपकेंद्र जोडून आहे आणि सोबत २९ गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे या भागांची लोकसंख्या साधारणपणे ६५ हजारांच्या आसपास असूनदेखील केंद्राला स्वतंत्र रुग्णवाहिका नाही.

त्यामुळे आरोग्य केंद्रावर उपचारासाठी आलेल्या गंभीर रुग्णाला तातडीने जर धुळ्याला पाठवायचे असेल तेथे जाण्यासाठी रुग्णवाहिका ऐनवेळेस मिळत नसल्याची नाराजगीचा सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. पूर्वी दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ टोल क्रमांकाची रुग्णवाहिका मिळाली होती. परंतु सदर रुग्णवाहिका आता निजामपूर-जैताणे येथील आरोग्य केंद्राला दिली आहे.

दुसाणे व परिसरासह रुग्णांचे काय हाल होतील या गोष्टींचा विचार अद्याप कुठल्याही लोकप्रतिनिधींनी केली नसल्याची खंत महावीर जैन यांनी व्यक्त केली आहे. गरोदरमातेला बाळंतपणाकरिता साक्री किंवा धुळे येथे पाठवत असताना १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधावा लागतो, परंतु येण्यासाठी २ ते ३ तास रुग्णवाहिकेला विलंब लागत असल्याने त्या गरोदरमातेला अनेक वेदना सहन करावा लागतात.

शिंदखेडा ते विहीरगाव फाटा या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. अशा दुर्दैवी घटना परिसरातून बघावयास मिळत असतात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने पुढील उपचार न मिळाल्यामुळे चार ते पाच लोकांचा मृत्यू ही झाल्याचे स्पष्टीकरण महावीर जैन यांनी केले.

Web Title: Will there be an ambulance for Malmatha area? Ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.