पोलिसात तक्रार केली म्हणून महिलेचा विनयभंग, तिघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 06:56 PM2023-04-03T18:56:00+5:302023-04-03T18:56:14+5:30
धुळे तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा
राजेंद्र शर्मा/धुळे
धुळे : पोलिसात तक्रार करण्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना १४ ऑगस्ट २०२२ रोजी घडली होती. परंतू वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे गुन्हा उशिरा दाखल केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
पीडित महिलेने धुळेे तालुका पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेेने संशयित आरोपीविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर हा विषय शांत झाला असलातरी पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात ठेऊन संशयित आरोपी सहा इतर दोन अशा तिघांनी नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळ्यानजीक साक्री रोडवर एका वसाहतीत पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी अश्लील शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली. यानंतर वैयक्तिक व कौटुंबिक कारणामुळे उशिरा महिलेने रविवारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पाटील घटनेचा तपास करीत आहे.