महिलेची 60 हजारांची सोन्याची पोत लंपास

By admin | Published: January 18, 2017 12:21 AM2017-01-18T00:21:39+5:302017-01-18T00:21:39+5:30

धुळे : देवपुरात चेन स्नॅचिंगची पुन्हा घटना घडली आह़े यात 60 हजार रु. किमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची पोत लंपास करण्यात आली़

The woman's 60,000 gold ship will be lumpen | महिलेची 60 हजारांची सोन्याची पोत लंपास

महिलेची 60 हजारांची सोन्याची पोत लंपास

Next


धुळे : देवपुरात चेन स्नॅचिंगची पुन्हा घटना घडली आह़े यात 60 हजार रु. किमतीची 3 तोळे वजनाची सोन्याची पोत लंपास करण्यात आली़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आह़े
शहरातील देवपूर भागात असणा:या शाहूनगरात आई-वडिलांना परत पायी जात असताना शाहूनगरच्या बगिच्याजवळ 25 ते 30 वयोगटातील अनोळखी दोन तरुण मोटारसायकलने आल़े त्यांनी मानेजवळ जोरात थाप मारली आणि सोन्याची पोत घेऊन पोबारा केला़ लंपास झालेली पोत 3 तोळ्याची असून तिची किंमत 60 हजार रुपये इतकी आह़े ही घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली़ घटना घडल्यानंतर आरडाओरड केली असता ते मोटारसायकलने पळून जाण्यात यशस्वी ठरल़े या घटनेची माहिती पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कळविण्यात आली़ 16 जानेवारी रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास निर्मला अशोक पाटील (रा़ आनंदनगर देवपूर, धुळे) यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मोटारसायकल लंपास
शहरातील गरीब नवाजनगर येथे वास्तव्यास असणारे काझी मुजफ्फर जावेद (33) यांच्या मालकीची एमएच 39-के 5552 क्रमांकाची मोटारसायकल चोरटय़ाने लंपास केली आह़े तिची अंदाजे 15 हजार किंमत आह़े वाहन चोरीची ही घटना 30 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत घडली़ शहरातील विविध भागात दुचाकीचा शोध घेण्यात आला होता़ शोध घेऊनही ती मिळून आली नाही़ त्यामुळे आझादनगर पोलीस ठाण्यात काझी जावेद यांनी 16 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली.पुढील तपास सुरू आह़े

Web Title: The woman's 60,000 gold ship will be lumpen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.