महिला सरपंच, उपसरपंचाविरुद्ध पाणीचोरी प्रकरणी गुन्हा

By admin | Published: May 29, 2017 04:21 AM2017-05-29T04:21:03+5:302017-05-29T04:21:03+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेची पाइपलाइन फोडून पाणीचोरी केल्याप्रकरणी सोनगीरच्या सरंपच योगिता अविनाश महाजन

Women sarpanch, offense against accused | महिला सरपंच, उपसरपंचाविरुद्ध पाणीचोरी प्रकरणी गुन्हा

महिला सरपंच, उपसरपंचाविरुद्ध पाणीचोरी प्रकरणी गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा (धुळे) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेची पाइपलाइन फोडून पाणीचोरी केल्याप्रकरणी सोनगीरच्या सरंपच योगिता अविनाश महाजन व उपसरपंच धनंजय श्रीराम कासार यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
महानगरपालिका कर्मचारी नरेंद्र काशिनाथ बागुल (४६) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात  यासंदर्भात फिर्याद दाखल केलेली आहे़ फिर्यादीनुसार सोनगीरच्या सरपंच आणि उपसरपंच यांनी  २६ मे रोजी सकाळी साडेनऊ  वाजेच्या सुमारास जामफळ धरणाजवळील तापी योजनेची पाइपलाइन फोडली़  तिचे रबर पॅकिंग व नट  उघडून पाइपलाईनमध्ये गळती निर्माण केली़ ते पाणी पिण्यासाठी
व शेतीसाठी वापरण्याचा प्रयत्न केला़ या दोघांनी २५ हजार रुपयांचे पाणी चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़

Web Title: Women sarpanch, offense against accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.