महिलांनी अधिकारांबाबत जागरुक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:53 PM2020-01-08T22:53:51+5:302020-01-08T22:55:11+5:30
शिरपूर : आर.सी. पटेल महाविद्यालयात महिला अत्याचारविषयक कार्यशाळेत अॅड.रेखा पहुजा
शिरपूर : पुरुष व महिला समान आहेत. तथापि, महिला त्यांच्या हक्कांबाबत जागरूक नसल्यामुळे मागे पडतात़ दुर्दैवाने जर एखादी वाईट घटना महिलांच्या बाबतीत घडल्यास पीडित महिलेने किंवा तिच्या नातेवाईकांनी ३ महिन्याचा आत कलम ३५४ अन्वये लेखी स्वरुपात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जळगाव येथील मणियार विधी महाविद्यालयाच्या अॅड.डॉ़रेखा पहुजा यांनी केले़
शहरातील आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी घटनेतील स्त्री-पुरुष समानता, मुले आणि महिला यांना असलेले अधिकार, सरकारी कार्यालयातील कामांचे समान विभाजन याबाबतही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.जी. सोनवणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.ए.एम. पाटील, डॉ.एच.बी. पाटील, डॉ.आर.एस. पवार, प्रा.आर.पी. महाजन, प्रा़शुभांगी पिंगळे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील म्हणाले, महिलांनी स्वत: आत्मसन्मान मिळवून अत्याचाराविरुद्ध संघर्ष केल्यास कोणीही त्यांचा गैरफायदा घेऊ शकत नाही. या कार्यशाळेत १२० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे संयोजन डॉ.ज्योती महाशब्दे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राजश्री चौधरी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गणेश सोनार, संजय मोरे, बी.टी. चौधरी, विजय कासार व राहुल पाटील आदींनी सहकार्य केले.