नसबंदीचा भार महिलांवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:16 PM2019-05-04T22:16:35+5:302019-05-04T22:16:54+5:30

महापालिका : एक वर्षात एकही पुरूषाकडून झाली नाही नसबंदी; उच्चशिक्षितांमध्येही गैरसमज

Women with sterilization burden! | नसबंदीचा भार महिलांवरच !

dhule

Next

धुळे : कुटुंब नियोजनासाठी सरकारने ‘हम दो हमारे दो ’चा नारा देत नसबंदीची योजना राबवली आहे. मात्र वर्षभरात महिलांच्या तुलनेत एकही पुरुषांकडून नसबंदी शस्त्रक्रियाच न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी पुरुषी मानसिकतेत जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत शासनाच्या नसबंदी कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अत्यल्पच राहणार हे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
११०० महिलांची शस्त्रक्रिया
शासनाकडून महापालिका आरोग्य केंद्राला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी २०१८-२०१९ या वर्षात १ हजार ७१८ उदिष्ठे देण्यात आले होते़ त्यापैकी १ हजार १२६ उदिष्ठे पुर्ण केले आहे़ त्यात दोन अपत्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात प्रशासनाने ६० टक्के उदिष्ठे पुर्ण केले आहे़
सकारात्मक परिणाम नाही
विवाहित जोडप्यापैकी पुरूष किंवा महिला या दोघांपैकी एकाची नसबंदी करण्यात येते़ महापालिकेच्या आरोग्य केद्रातर्फे नसबंदी बाबत बरीच जनजागृती झाल्यानंतर नसबंदीचे प्रमाण वाढले़ मात्र महिलांचाच समावेश जास्त आहे़ महिलांच्या तुलनेत पुरूषांची शस्त्रक्रिया साधी व सोप्या पध्दतीने असते़
महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढावे, यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे़ मात्र सकारात्मक परिणाम अद्याप दिसुन आलेला नाही़
सहा पुरूषांनी घेतला पुढाकार
महापालिका आरोग्य केंद्रात २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात सहा पुरूषांनी स्वत:हून नसबंदी करून घेतली आहे़ तर २०१८-१९ या वर्षात १ हजार १२६ महिलांची कुंटूब शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर एकही पुरूषाची नसबंदी झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले़
आरोग्य केंद्रातून मिळेल सुविधा
महापालिका आरोग्य केद्रामार्फेत प्रसुतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे़ काही वर्षात आरोग्य केंद्र, शासकीय व खाजगी रुग्णालयामधून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त महिला प्रसुती झाल्या आहेत. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत २४ तास सेवा रुग्णवाहिकेची सुविधा आहे़ त्यामुळे गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळंतपणे, प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या मोफत सुविधांचा समावेश आहे.
बॅक खात्यात मिळतो लाभ
कुंटूब नियोजनासाठी शासनाकडून पुरूषांना ११०० रु.चे अर्थसहाय्य दिले जाते़ तर बीपीएल रेशनकार्ड धारक महिला लाभार्थ्यांना ६०० तर इतर महिला लाभार्थ्यांना २५० रूपयांपर्यत अर्थसहाय्य शासनाकडून त्यांच्या बॅकेच्या खात्याद्वारे देण्यात येते़
राज्यात पुरूष नसबंदी केवळ १६ टक्के
पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया आहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे.ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा करता येते.या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते़ मात्र तरी देखील समाजात नसबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात समज-गैरसमाज आहेत़
पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनीटाची असुन अतिशय सोप्यापध्दतीची आहे़ शस्त्रक्रियेनंतर पुरूषांना ११०० रूपयापर्यत मानधन दिले जाते़ तर महिलांना शस्त्रक्रियेसाठी आठ दिवस दवाखान्यात दाखल व्हावे लागते़ एप्रिल २०१८-२०१९ या कालावधीत राज्यातील ३ लाख २८ हजार ०६६ महिलांनी कुंटूब नियोजन केले आहे़ त्यात २.९६ टक्के पुरूषांनी शस्त्रक्रिया केली असुन फक्त १६ टक्के पुरूषांची उदिष्ठे आहे़

Web Title: Women with sterilization burden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे