मुलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला महिलांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:34 PM2019-12-27T22:34:54+5:302019-12-27T22:35:55+5:30

रामचंद्र नगर : तातडीने समस्या सोडविण्याची मागणी

Women's approach to administration to solve basic problems | मुलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला महिलांचे साकडे

Dhule

Next

धुळे : शहरातील रामचंद्र नगरात नागरिकांना नागरी समस्यांना सामोेरे जावे लागत आहे़ प्रभागात सांडपाणी, घंटागाडी, विजेची व पाण्याची समस्या तातडीने पुरवाव्यात अशा मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़
शहरातील प्रभाग ११ मधील रामचंद्र नगर व लक्ष्मी नगर परिसरात मनपा प्रशासनाकडून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाही़ तत्कालिन पदाधिकाऱ्यांमार्फेत रस्ते, गटार, पिण्याचे पाण्याची व्यवस्था झालेली नाही़ त्यामुळे नागरिकांना सांडपाणी, गटारी, घंटागाडी, डासांची समस्या वाढल्या आहेत़
येथील रामचंद्र नगरामधील बहूसंख्य विजेचे खांब वादळी वाऱ्यांने वाकलेले आहेत़ त्यामुळे नागरिकांना वीजतारांचा धोका आहे़ भविष्यात प्राणहाणी होण्याची शक्यता असल्याने तातडीने खांब ची दुरूस्ती तसेच प्रभागातील मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन अभियंता केैलास शिंदे यांना देण्यात आले़
निवेदनावर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर सरचिटणीस प्रविणा भावे, जिल्हा सचिव निलेश चौधरी,ज्योती धात्रक, पुनम विभांडिक, रेशा भांरबे, सुनिता गांगुर्डे, नंदिनी चौधरी, प्रतिभा बागुल, जया बागुल, संजय धात्रक, नितीन पाटील, कवीता सुर्यंवंशी, कल्पना सोनवणे आदींच्या स्वाक्षºया आहेत़

Web Title: Women's approach to administration to solve basic problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे