असली येथे महिला शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 09:13 PM2020-09-16T21:13:18+5:302020-09-16T21:14:07+5:30
विविध फवारणीची दिली माहिती : अनेक महिलांची उपस्थिती
शिरपूर : या तालुक्यात किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प अंतर्गत तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीशाळा सुरु करण्यात आली असून असली येथे महिला शेतीशाळेला सुरूवात झाली़
कृषी क्षेत्रातील शेती व्यवसायात महिलांचा सहभाग पूर्वीपासूनच आहे. आजही शेती निर्णयात महिलांचे योगदान लक्षात घेता महिलांना तांत्रिकदृष्ट्या अधिक आत्मनिर्भर व निर्णयक्षम होण्यासाठी थाळनेर मंडळातील असली येथे महिला शेतीशाळा आयोजीत केली. यात मंडळ कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी पीक उत्पादन खर्च कमी करणे व शेती अधिक शाश्वत तसेच किफायातशिर होण्यासाठी कामगंध सापळे यांचा वापर करून निंबोळी अर्काची फवारणी, सापळा पिकांचे मित्र किड संवर्धनासाठी महत्व, एकत्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबींवर मार्गदर्शन केले. शेतीशाळा हा उपक्रम प्रत्यक्ष कापूस प्रक्षेत्रावरच घेत असल्याने शेतकऱ्यांना पीक परिस्थिती व किडींची ओळख चांगल्या प्रकारे होते.या शेतीशाळेत कृषी सहाय्यक महेंद्र पाटील, किशोर पगारे, रोहिणी वळवी यांनीही मर्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सरपंच उखडू कोळी, जितेंद्र कोळी, आशा कोळी, अरुणा कोळी, अर्चना कोळी, अनितबाई कोळी तसेच विविध महिला बचत गटांचे सहकार्य लाभले. सोशल डिन्टन्सिंग राखत महिलांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली़