धर्मनिरपेक्ष समाजासाठी दलाचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:28 PM2019-04-16T12:28:49+5:302019-04-16T12:29:46+5:30
राष्ट्र सेवा संघातर्फे आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सदाशिव मगदूम़
धुळे : आजच्या बदलत्या परिस्थितीत राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांची व विचारांची गरज आहे. धर्मनिरपेक्ष समाज निर्माण व्हावा यासाठी राष्ट्र सेवा दलाने केलेले प्रयत्न व सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे माजी राष्ट्रीय महामंत्री सदाभाऊ मगदूम यांनी सांगितले़ शहरातील मातृसेवा संघाच्या बालमंदिरात राष्ट्र सेवा दलातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांसाठी १५ ते १९ एप्रिल या कालावधीत पाच दिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ या शिबीराचे उदघाटन सोमवारी सकाळी १० वाजता माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत पन्नलाल सुराणा यांच्या हस्ते झाले़ यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा़अरविंद कपोले, ज्येष्ठ सैनिक वसंतराव ठाकरे, लक्ष्मण बोरसे, प्रा़मुकुंद बरिदे, जगदीश देवपूरकर आदी उपस्थित होते़ शिबीराच्या दुसºया संत्रात विणा नांदेडकर यांच्या हास्यजत्रा व नकलांच्या कार्यक्रमाने शिबिरार्थ्यांना हसविले़ यावेळी विद्यार्थ्यांना लेझिम अॅरोबिक, मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले़ याप्रसंगी धुळे शहर राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष नितीन माने, अॅड़मिलिंद बोरसे, रमेश पवार, रमेश सांवत, रामेश्वर चौधरी, भैय्या पाटील, विजय महाले, रामदास जगताप, रमेश काकडे, अशफाक खाटीक, विनोद रोकडे, दिलीप पाटील, कानिफनाथ सुर्यवंशी, बच्चूभाई सोनार आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़