धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना कर्तव्यसूचीनुसार कामकाज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:38 AM2019-03-15T11:38:40+5:302019-03-15T11:40:24+5:30
कर्मचारी संघटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
आॅनलाइन लोकमत
धुळे : राज्य शासनाने नुकतीच लिपीकवर्गीय कर्तव्य सूची (जॉब चार्ट) ठरवून दिलेली आहे. त्याची अमलबजावणी करून, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना कर्तव्यसूचीनुसारच कामकाज देण्यात यावे, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या धुळे शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये कर्मचाºयांची कर्तव्यसूची तयार करणे बंधनकारक आहे. मात्र जिल्हा परिषदेतील लिपीकवर्गीय कर्मचाºयांची कर्तव्यसूची अद्यापपर्यंत शासनाने ठरवून दिलेली नव्हती. कर्तव्यसूची नसल्याने लिपीकवर्गीय कर्मचाºयांना वेगवेगळी कामे करावी लागत होती. त्यामुळे कर्मचाºयांमध्येही कामाबाबत संभ्रमनिर्माण झालेला होता.
कक्ष अधिकारी, कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या लिपीकवर्गीय संवर्गाच्या कर्मचाºयांची कर्तव्य सूची तयार करावी अशी मागणी राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा करण्यात आली होती. त्यासाठी संघटनेने शासनाला निवेदन दिली. आंदोलन करून पाठपुरावा सुरू ठेवलेला होता.
कर्मचाºयांनी केलेल्या पाठपुराव्याची शासनाने नुकतीच दखल घेतलेली आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रि.शं.कांबळे यांनी २५ फेब्रुवारी १९ रोजी एक अध्यादेश पारीत केला. त्यात लिपीकवर्गीय कर्मचाºयांची कर्तव्यसूची ठरवून देण्यात आलेली आहे. आता कर्तव्यसूचीमध्ये नमूद असल्यानुसार योग्य ते कामकाज सोपविण्यात यावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.
तसेच जिल्हा परिषद कर्मचारी हे विनंती बदलीस चार वर्षांनी पात्र होत होते. मात्र आता शासनाच्या नवीन निर्णयामुळे जि.प.कर्मचारी हे विनंती बदलीत तीन वर्षात पात्र होतील असा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचेही कर्मचाºयांनी स्वागत केले आहे.
शासनाने घेतलेल्या वरील दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करून, कर्तव्यसूचीनुसार कामकाज द्यावे अशी मागणी संघटनेतर्फे आज करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना निवेदन देतेवेळी संघटनेच पदाधिकारी वनराज पाटील,एकनाथ चव्हाण, मुकुंदा पगारे, भानुदास पाटील, शिवाजी भामरे, प्रफुल्ल चव्हाण, गिरीश ठाकूर, राजेंद्र देव, हेमंत पवार, मंगेश राजपूत आदीजण उपस्थित होते.