‘जिओ टॅगिंग’ च्या कामात धुळे जिल्ह्याची नाशिक विभागात आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:36 PM2017-11-22T17:36:38+5:302017-11-22T17:37:44+5:30
राज्यात पाचवे स्थान : राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर यंत्रणा गतिमान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे जिल्हा ‘जिओ टॅगिंग’ च्या कामात पिछाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने जिओ टॅगिंगचे काम गतीने पूर्ण करून दाखवत मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर नाशिक विभागात जिओ टॅगिंगच्या कामात आघाडी घेतली असून राज्यात पाच नंबरचे स्थान मिळविले आहे.
राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची नाशिक विभागस्तरीय आढावा बैठक धुळ्यात ११ नोव्हेंबरला झाली होती. या बैठकीत धुळे जिल्ह्याचे ‘जिओ टॅगिंंग’ चे काम हे ४० टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. त्यावेळी मंत्री प्रा. शिंदे यांनी हे काम ज्यांच्या अखत्यारित आहे, असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ व नितीन गावंडे यांना बैठकीत धारेवर धरत हे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
राज्यात पाचव्या क्रमांकावर धुळे जिल्हा
प्राप्त माहितीनुसार जिओ टॅगिंगच्या कामाबाबत धुळे जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी असून प्रथम स्थानावर अमरावती विभागातील वाशिम जिल्हा आहे. या जिल्ह्याचे काम ९५.५९ टक्के इतके झाले आहे. राज्यात जिओ टॅगिंगच्या कामात दुसºया, तिसºया व चौथ्या स्थानी नागपूर विभागातील वर्धा (९३.३७ टक्के), भंडारा (९२.१९ टक्के), नागपूर (७९.५२ टक्के) आहे.
आढावा बैठकीनंतर प्रांताधिकाºयांनी संबंदित अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना जिओ टॅगिंगचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ४० टक्क्यांपेक्षा कमी असलेले काम आता ७८.४ टक्के इतके झाले आहे. त्याखालोखाल अर्थात दुसºयास्थानी आघाडीवर असलेला अहमदनगर जिल्ह्याचे काम ७७.८४ टक्के इतके झाले आहे. नंदुरबार ७२.२२ टक्के, नाशिक जिल्ह्याचे काम ६४.१७ टक्के तर जळगाव जिल्ह्याचे जिओ टॅगिंगचे काम हे केवळ ४८.३३ टक्के इतके हा जिल्हा नाशिक विभागात पिछाडीवर पडला आहे.